तरुण भारत

सिव्हीलमध्ये राडा करणाऱया तृतीयपंथियांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी/ सातारा

तृतीयपंथी असल्याने वेगळी वागणूक डॉक्टरांनी दिल्याचा आरोप करत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय डोक्यावर घेत दहशत माजवणाऱया तृतीयपंथीयांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. औषधउपचारासाठी ज्या डॉक्टराकडे गेल्या त्याच डॉ. पोळ यांना त्यांनी कानपडले, त्यांचा स्टेटस्कोप फोडून टाकत शिवीगाळ करत दहशत माजवली होती. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्यासमोर पाया पडायला लावले होते. या प्रकरणात पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.

Advertisements

कोरोना काळात जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांची सेवा देत आहेत. उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांशीही डॉक्टर प्रेमाने, आदबीने बोलतात असे सांगितले जाते. असे असताना दि. 7 रोजी दुपारी बारा वाजता काही तृतीयपंथी हे उपचारासाठी गेले होते. तेथे नंबर येताच डॉक्टरांनी पाच फुट अंतर राखा असे म्हणाल्यावरुन चिडून जावून तृतीयपंथीयांना हिन दर्जाची वागणूक दिली जाते असे समज निर्माण करत सेवा देणाऱया डॉक्टरांनाच संग्राम संस्थेच्या आर्या पुजारी, हिना पवार व तिच्यासोबेत अन्य तिघींनी व एका व्यक्तीने शिवीगाळ करुन त्यांना हाताने मारहाण करत त्यांच्या गळय़ातील स्टेस्टोस्कोप मोडून वैद्यकीय साहित्याची मोडतोड करुन नुकसान केले. या प्रकाराने चांगलाच गेंधळ त्या दिवशी निर्माण झाला होता. त्यांनी हे प्रकरण जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या केबीनमध्ये नेवून तेथे देखील डॉ. पोळ यांना शिवीगाळ व दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली. डॉ. पोळ यांनी मारहाणीच्या भितीने त्या तृतीयपंथींच्या पाया पडून जाहीर माफी मागितली.

जिल्हा रुग्णालयात केलेल्या राडय़ाप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.स.353, 323, 504, 506, 143, 147, 149, वैद्यकीय अधिकारी नियम 2010 कलम 4 अन्वये राडा करणाऱया त्या तृतीयपंथियांवर गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे हे तपास करत आहेत. सातारा शहर पोलीस या गुह्यातील तृतीयपंथींना लवकरच अटक करणार आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

‘भाजपाच्या ‘या’ निर्णयामुळे देशात कोरोनाची दुसरी लाट’

Abhijeet Shinde

शरद पवारांच्या बैठकीला सेनेला निमंत्रण नाही, संजय राऊत म्हणाले…

Rohan_P

खोतवाडीत परप्रांतियांची ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर दगडफेक

Abhijeet Shinde

कोल्हापूर : नेर्ली येथे तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू

Abhijeet Shinde

नुकसानीचा राजकीय ‘पंचनामा’

Abhijeet Shinde

सत्ताधाऱ्यांकडून फेरीवाल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार

datta jadhav
error: Content is protected !!