तरुण भारत

थावरचंद गहलोत यांनी कर्नाटकचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ

बेंगळूर/प्रतिनिधी

थावरचंद गहलोत यांनी आज( रविवारी) कर्नाटकचे नवे राज्यपाल म्हणून शपथ घेतील. दरम्यान, ११ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता हा शपथविधी कार्यक्रम राज भवनच्या ग्लास हाऊसमध्ये पार पडला. त्यावेळी “कर्नाटक हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश अभय श्रीनिवास ओक यांनी नवीन राज्यपालांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.”

दरम्यान केंद्री मंत्रिमंडळ विस्तार होण्याआधी राष्ट्रपती कार्यालयाकडून कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश सह ६ राज्यांच्या नव्या राज्यपालांची यादी जारीकरत यामध्ये थावरचंद गहलोत यांची कर्नाटकचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. थावरचंद गहलोत हे मोदींच्या पहिल्या मंत्रीमंडळात केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री होते. पण नव्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी मोदींनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेत त्यांची कर्नाटकच्या राज्यपाल पदी वर्णी लावली.

Advertisements

Related Stories

‘बॅड बँक’ प्रस्तावाला केंद्र सरकारची मान्यता

Amit Kulkarni

दिलासादायक : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 22,078 रुग्ण कोरोनामुक्त

Rohan_P

गुजरातमधील नाईट कर्फ्यूच्या वेळेत आणखी एक तासाची सूट

Rohan_P

Maharashtra HSC Result 2021: बारावीच्या निकालासाठी मूल्यमापन पद्धत जाहीर

Abhijeet Shinde

‘फडणवीस जनतेची दिशाभूल करत आहेत’

Abhijeet Shinde

“ठाकरे-पवार हिंमत असेल तर मला अडवून दाखवा”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!