तरुण भारत

शिवसेना प्रवेशाबाबत उज्ज्वल निकम यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई/प्रतिक्रिया

उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅ. उज्ज्वल निकम यांची भेट घेतली आहे.
दरम्यान, जळगाव दौऱ्यावर असणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे दोन दिवस जळगाव दौऱ्यावर होते. त्यावेळी शिंदे यांनी शनिवारी उज्ज्वल निकम यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे सेनेकडून निकम यांना पक्षात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे. उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी नेत्यांकडून प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जात आहे. याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील जळगाव दौऱ्यावर असताना उज्ज्वल निकम यांची भेट घेतली होती.

जळगाव दौऱ्यावर असणारे एकनाथ शिंदे शनिवारी उज्ज्वल निकम यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. जवळपास १५ ते २० मिनिटं उज्ज्वल निकम आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरु होती. यावेळी नेमकी काय चर्चा झाली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र यावेळी उज्ज्वल निकम यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

एकनाथ शिंदे भेटीवर उज्ज्वल निकम त्यांची प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे जळगाव दौऱ्यावर असताना त्यांनी उज्ज्वल निकम यांची भेट घेतली. या भेटीनंतर निकम यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. या चर्चा सुरु असताना उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली असून मी अद्याप राजकारणात येण्याचा विचार केलेला नाही़ असं म्हटलं आहे.

“एकनाथ शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा झाली असून त्याचा तपशील सांगता येणार नाही. यापूर्वी मी शरद पवार यांचा प्रस्तावही नाकारला होता. खासदार संजय राऊत आणि माझी गेल्या महिन्यातील भेट ही केवळ सदिच्छा भेट होती. माझे सर्वच पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध असल्याने ते घरी येत असतात,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

Advertisements

Related Stories

विनापरवानगी फ्लेक्स प्रकरणी 5 जणांवर गुन्हे

Patil_p

सोलापुरात आतापर्यंत 210 जण कोरोनामुक्त होवून घरी

Abhijeet Shinde

कारवाई करण्यासाठी पालिकेची आता पाच पथक सक्रिय

Patil_p

सातारा : जिल्हात रुग्णसंख्या तीन हजारावर

Abhijeet Shinde

कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

Abhijeet Shinde

“पंजाबमधील घडामोडींमुळे पाकिस्तान खूश”; मनिष तिवारींचा सिद्धूवर घणाघात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!