तरुण भारत

तिलारी रामघाटात कारचे ब्रेक फेल झाल्याने अपघात

सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत कारमधील प्रवाशांना काढले बाहेर

साटेली भेडशी/ प्रतिनिधी-

Advertisements

बेळगावहुन तिलारी रामघाटमार्गे गोवा येथे जात असणाऱ्या कार गाडीचे ब्रेक फेल झाल्याने ही कार घाट रस्त्यातील संरक्षक कठड्याला धडकून गाडीचे नुकसान झाले तर कारमधील दोघांना गंभीर दुखापत झाली आहे.

सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत कारमधील प्रवाशांना बाहेर काढले व पुढील उपचारासाठी संपर्क साधत वाहन उपलब्ध करून दिले.

गाडीत एकूण चार प्रवासी होते अपघातात यामधील एकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली तर एकाला मुका मार लागला तर अन्य दोघाना किरकोळ दुखापत झाली आहे.

कारमधील हे प्रवाशी आय डी बी आय बँकेचे कर्मचारी असल्याचे समजते ते बेळगावहून गोव्यात जात होते.

Related Stories

मुंबईला आज ऑरेंज अलर्ट; पुढील 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

Rohan_P

पँगाँग भागात चीन उभारतोय पूल

Sumit Tambekar

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सावंतवाडी तालुका पूरग्रस्तांना मदत

Ganeshprasad Gogate

येत्या 1 महिन्यानंतर मच्छीमारांना क्यार वादळाची नुकसानी मिळणार

NIKHIL_N

केर – मोर्ले येथील मुलांची शिक्षणासाठी पायपीट

NIKHIL_N

रेल्वे गाडय़ा बंदची मालिका सुरूच

NIKHIL_N
error: Content is protected !!