तरुण भारत

महाविकास आघाडी सरकार हे विद्यार्थ्यांना न्याय देणार – अॅड. पुजा झोळे

प्रतिनिधी / करमाळा –

एमपीएससी आयोगाचे सक्षमीकरण करून आयोगाच्या रचनेत बदल करणेबाबत आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची गोविंदबाग बारामती येथे करमाळा येथील राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अॅड. पुजा झोळे यांनी भेट घेऊन निवेदन दिले व त्यावर सविस्तर चर्चा केली. यावेळी शरद पवार यांनी यावर लवकरच सकारात्मक निर्णय होईल असे सांगितले.

Advertisements

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०१९ रोजी राज्यसेवेमार्फत ४१३ पदांची परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षेचा निकाल लागलेला असून मराठा आरक्षणामुळे सदर उमेदवारांच्या नियुक्‍त्या रखडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण प्रश्नी ५ मे २०२१ रोजी दिलेल्या सुधारित निकालानुसार योग्य तो बदल करून सर्व उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्‍त्या देण्यात याव्यात. या आयोगामध्ये रचनात्मक बदल करून आयोगाची सदस्य संख्या, कर्मचारी संख्या वाढवून आयोगाच्या कार्याचे प्रभावी सक्षमीकरण करावे.

शासकीय सेवेत जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी यावेत यासाठी एमपीएससी आयोगाचे पुढील वर्षाचे वेळापत्रक १ वर्ष आधी जाहीर करावे. सर्व शासकीय सेवेतील गट अ ते गट ड ही पदे एमपीएससी मार्फत भरून पारदर्शक वातावरणात परीक्षा घ्याव्यात जेणेकरून प्रामाणिक आणि हुशार अधिकारी शासकीय सेवेत येतील.

अशा मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या युवती प्रदेश सरचिटणीस पुजा झोळे यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सोसिअल मीडिया अध्यक्ष मिलिंद गोरे, सरचिटणीस ज्योतिबा गुंड, सौरभ राऊत, अनुप देशमुख, डॉ. राज जाधव, डॉ. ऋषिकेश भवर, अक्षय काटे उपस्थित होते.

Related Stories

सावित्रीबाई फुले जयंती दिनी युवा चित्रकार विपुल मिरजकर यांनी साकारली भव्य दिव्य रांगोळी

Abhijeet Shinde

सोलापूर : सावकारकी विरोधात पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

टेम्पोची दुचाकीला धडक; दोघेजण जखमी

Abhijeet Shinde

ब्रह्मर्षी विवेकानंदांच्या तत्त्वावर देशहित साधणारा ‘राजर्षी मोदी’

Abhijeet Shinde

सोलापूर : बार्शीत विनापरवाना दुतर्फा वृक्ष लागवड, नगरपरिषदेच्यावतीने गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

अवयवदान पदयात्रेचा ससूनमध्ये संवाद कार्यक्रम संपन्न

prashant_c
error: Content is protected !!