तरुण भारत

दूध दरवाढ म्हणजे वचनपूर्ती नव्हे : शौमिका महाडिक

विरोधी संचालकांच्या वतीने शोमिका महाडिक यांची पत्रकातून टीका

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

सत्ताधारी नेत्यांनी मोठा लवाजमा घेऊन दूध खरेदी दरवाढ जाहीर केली एकूण या लोकांच्या अविर्भावातून असं भासवण्याचा प्रयत्न केला गेला की जणू ही दरवाढ देऊन वचनपूर्ती केली आहे. पण ही दरवाढ म्हणजे वचनपूर्ती नव्हे असा टोला विरोधी संचालकांच्या वतीने शौमिका महाडिक यांनी लगावला आहे.

पण जे सार दाखवलं जातंय त्यापेक्षा सत्य काहीतरी वेगळेच आहे आणि सर्व दूध उत्पादकांनी ही सत्य परिस्थिती समजून घेतली पाहिजे असे आवाहन महाडिक यांनी पत्रकात केले.

पत्रकात म्हटले आहे की, संघाच्या वाटचालीमध्ये एका ठराविक कालांतराने दूध खरेदी – विक्री दरामध्ये वाढ होतच असते आताही पुणे – मुंबईमधील दूध विक्रीच्या दरात वाढ केल्यानंतरच इथे खरेदी दरात वाढ केली आहे. आज या सत्ताधाऱ्यांच्या ठिकाणी आम्ही असतो किंवा दुसरं कोणीही असतं तरी एका ठराविक वेळेनंतर रीतसर खरेदी – विक्री दरात वाढ करावी लागली असती. त्यातही यंदा केलेल्या नवीन विक्री दरवाढीनुसार पुणे – मुंबई येथील विक्रीमधून संघाला जी रक्कम मिळणार आहे व त्यातून दूध उत्पादकाला खरेदीसाठी जी वाढीव रक्कम देण्यात येणार आहे.

यामध्येही प्रचंड तफावत आहे. वाढलेल्या दरानुसार मिळणाऱ्या रकमेचा पूर्ण वाटा दूध उत्पादकाला न देण्याचा घाट कशासाठी घातला जातोय ? हासुद्धा प्रश्न आहेच त्यामुळे या सगळ्यात सत्ताधाऱ्यांनी पाठ थोपटून घेण्याचं असं काहीच कारण उरत नाही खरंतर अशा पद्धतीची रुटीन दरवाढ या आधीही झालेली आहे आणि यानंतरही होत राहिल फरक एवढाच आहे की, आमची सत्ता होती तेव्हा आम्ही अशा दरवाढीच भांडवल केलं नाही याचेच नेते निवडणुकीवेळी जाहीर सभेत म्हणाले होते की, ‘ग्राहकांवर बोजा न टाकता आम्ही दूध खरेदीमध्ये ४ रुपये दरवाढ देऊन दाखवतो. त्यामुळे शेवटी सर्व दूध उत्पादकांच्यावतीने आमची इतकीच मागणी राहील की रुटीन दरवाढीचा फायदा घेऊन त्याआड दूध उत्पादक शेतकयांची दिशाभूल करण्यापेक्षा दिलेले आश्वासन खरोखर कधी पूर्ण करणार व दूध उत्पादकांना कायमस्वरूपी दरवाढ कधी देणार याचा खुलासा करावा असे महाडिक यांनी पत्रकात म्हटले आहे.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात 46 हजारांवर कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

कोल्हापूर : औद्योगिक क्षेत्रात वेल्डर कामगारांची कमतरता

Abhijeet Shinde

मंत्री हसन मुश्रीफ यांची बदनामी सहन केली जाणार नाही

Abhijeet Shinde

कोल्हापूर : ‘इंडियन हेअर कटिंग सलून’चे मालक प्रकाश माने यांचे निधन

Abhijeet Shinde

सत्तेचा गैरवापर करून पिक कर्ज न देणे कितपत योग्य ?

Abhijeet Shinde

अंबाबाई मंदीर व्यवस्थापनाकरिता कायद्याची अंमलबजावणी करा -आ. प्रकाश आबिटकर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!