तरुण भारत

लखनऊमध्ये एटीएसने दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या

ऑनलाईन टीम / लखनौ

गेल्या काही दिवसांपासून देशात अनेक ठीकाणी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. जम्मु काश्मिरमध्ये सरकारने आंतरराष्ट्रीय दहशतवादी सय्यद सलाऊद्दीन याच्या दोन्ही मुलांना दहशतवाद्यांशी हितसंबंध आणि वित्तसंबध असल्याचा आरोप ठेवत सरकारी नोकरीवरुन निलंबित केले आहे. अशीच कारवाई उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊमध्ये दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस ) केली.

लखनऊमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर एटीएसच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत काकोरी पोलीस ठाणे परिसरातील एक घराला वेढा घालत कारवाई करण्यात आली. यावेळी अल कायदाच्या दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. हे दोन्ही हस्तक पाकिस्तानी असून त्यांना पकडण्यात एटीएसला यश आले आहे. या वेळी मोठ्या प्रमाणात स्फोटके ही जप्त केली असुन, घातपाताचा मोठा कट उधळला असल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.

सकाळी दहा वाजता ही कारवाई सुरु केली होती ती बराच वेळ सूरु होती. या कारवाई दरम्यान काकोरी पोलीसांनी संशयित परिसरातील नागरी परिसर पिंजून काढला असून काही घरे रिकामी ही केली होती.

Advertisements

Related Stories

जय गणेश ज्ञानवर्धन अभियानातील विद्यार्थ्यांचा 12 वीचा निकाल शंभर टक्के

Rohan_P

हैदराबादमध्ये भाजपचे दिग्गज प्रचारात

Omkar B

रकुल प्रीत सिंह, रवी तेजा, राणा डग्गुबतीला ईडीने बजावला समन्स

Abhijeet Shinde

व्यंकय्या नायडूंनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

datta jadhav

मुख्यमंत्री बोम्माई आज जीएसटी परताव्याबाबत अर्थमंत्री सीतारमण यांना भेटणार

Abhijeet Shinde

भारताला भीती दाखवण्याचा चीनचा प्रयत्न

Patil_p
error: Content is protected !!