तरुण भारत

सहा महिन्यात 3 लाखाहून अधिक वाहनचालकांना दंड

प्रतिनिधी /पणजी

 गोवा पोलीस खात्याच्या वाहतूक विभागाने गेल्या सहा महिन्यात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी केलेल्या कारवाईत सुमारे 3 लाखाहून अधिक वाहन चालकांना दंड ठोठावला आहे. यात दुचाकी तसेच चार चाकी वाहन चालकांचा समावेश आहे. अधिकाधिक दुचाकी चालक हेल्मेटचा वापर करीत नसल्याने 1 लाखाहून अधिक दुचाकीस्वरांना दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

Advertisements

राज्यात अपघातांची संख्या वाढत असून त्यात युवकांचा मृत्य होण्याचे प्रमाण वाढले आहे. अधिकाधिक युवावर्ग वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याने वाहन अपघातांच्या संखेत वाढ होत आहे. धुम स्टाईलने वाहने चालविणे हेही अपघाताचे मुख्य कारण आहे. वाहन चालक स्वतः अडचणीत येत असतो मात्र अनेकवेळा दुसऱयालाही अडचणीत आणित असतो. वाहतुक नियमांचे उल्लंघन करणे कमी व्हावे म्हणून वाहतूक पोलीस कसून प्रयत्न करीत आहेत. दर दिवशी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱया कित्येक वाहनचालकांना दंड ठोठावत आहेत.   

छेटे मोठे नियमांचेही वाहन चालक पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या सहा महिन्यात विविध वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱयावर पोलिसांनी कारवाई केली आहे. यात वाहन चालविताना सिटबेल्टचा वापर न केल्या प्रकरणी सुमारे 45 हजाराहून अधिक चारचाकी वाहन चालकांना दंड देण्यात आला आहे. वाहनाच्या काचा काळ्या केल्या प्रकरणी 17 हजार 613 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. काळ्या काच केलेल्यावर कारवाई केल्यानंतरही पुन्हा तीच चुक वाहनमालक करीत असल्याचे दिसून येते. आजही कित्येक वाहनांच्या काचा काळ्या अस्लयाचे दिसून येत आहे. अधिकाधिक पोलिसांच्या, राजकीय व्यक्तींशी संबंधीत असलेल्यांच्या तसेच धनाडय़ लोकांच्या वाहानांच्या काचा काळ्या असतात त्यांच्यावर कारवाई केली तरी पुन्हा हे लोक आपल्या वाहनांच्या काचा काळ्या करीत असतात. अनेकवेळा पोलीस कारवाई करीत असताना एखाद्या वरीष्ठ अधिकाऱयाचा किंवा राजकीय नेत्याचा फोन येत असल्याने कारवाई करणे कठीम होत असल्याची माहिती एका पोलीस कर्मचाऱयांने दिली आहे. वाहेन चालविताना मोबाईलचा वापर करणे, मद्यपान करून वाहन चालविणे किंवा अतीवेगाने वाहन चालविल्यामुळे अधिकाधिक अपघात होत असतात. अनेक वेळा दुचाकीचालक हेल्मेटचा वापर करीत नसल्याने अपघातात दुचाकी चालकाचा हमखास मृत्यू होत असतो. मद्यपान करून वाहन चालविल्या प्रकरणी 249 जणांना दंड देण्यात आला आहे. वाहन चालविताना मोबाईलचा वापर केल्या प्रकणी 1 हजार 201 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. बेकायदेशीर लाल रंगाच्या लाईटचा वापर करणाऱया 933 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. अतीवेगाने वाहने चालविणाऱया 3 हजार 56 चालकाना दंड ठोठावण्यात आला आहे. मालवाहक वाहनातून प्रवाशांना नेणाऱया 142 वाहन चालकांवर करवाई करण्यात आली आहे. नोएन्ट्री मधून वाहने चालवून सर्वसमान्य लोकांना धोका निर्माण करणाऱया वाहनचालकांना 5 हजार 8 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलांना वाहनचालविताना 323 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. घातक वाहन चालविणाऱया 2 हाजर 278 वाहन चालकांना दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच वाहन चालक परवाना नसताना वाहन चालविणाऱया 2 हजार 727 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

Related Stories

प्रतिभावान तरुणांर्पंत विज्ञान पोहोचले पाहिजे

Amit Kulkarni

आज ठरणार लॉकडाऊन कालावधी

Omkar B

रवी नाईक यांची मडकईत पुन्हा ‘चाय पे चर्चा’

Patil_p

सावर्डेतही पुराचे पाणी घुसल्याने नुकसान

Omkar B

19 डिसेबंर पर्यंत कुळ मुडंकार खटले निकालात काढून कुळांना न्याय देवू

Amit Kulkarni

येत्या दोन वर्षांत राज्यात 8 हजार नोकऱया निघणार.

tarunbharat
error: Content is protected !!