तरुण भारत

जम्मू काश्मीर : गंदरबलमध्ये अतिवृष्टी, ढगफुटीने उडाला हाहाकार

ऑंनलाईन टीम / श्रीनगर

देशातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशीच स्थिती जम्मू – काश्मीर मधील गंदरबल जिल्ह्यामध्ये ढगफुटीने झाली आहे. अतीवृष्टीने जणू आभाळ फाटलं असावं अशी स्थिती गंदरबालमध्ये झाली आहे. यामुळे नद्यांना पूर आला असून यापरिसरात मोठे नुकसान झाले आहे.

अनेक ठिकाणी नाल्यांना नदीचे स्वरुप आले आहे. तर नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली आहे. या अती पर्जन्यवृष्टीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गंदरबलमधील काही भागात परिस्थिती गंभीर झाली असली तरी अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे माहिती आहे.

अनेक राज्यात पावसाची दमदार हजेरी

देशात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असून हिमाचल प्रदेशातील धरमसाला येथे ही अति पर्जन्यवृष्टीने हाहाकार उडाला असून काही ठिकाणी नागरिकांची घरे, वाहने वाहून गेली आहेत.

Advertisements

Related Stories

अंबरनाथ : एमआयडीसीमधील बिस्कीट कंपनीला भीषण आग

Rohan_P

‘स्पुतनिक लाइट’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला मंजुरी

datta jadhav

मुंबई : वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला महिलेकडून मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Rohan_P

कोरोनामुळे अक्षय तृतीया मुहूर्तावर लाखोंची उलाढाल ठप्प

Abhijeet Shinde

चौथ्यांदा लॉकडाउनमुळे व्हिक्टोरियात संताप

Patil_p

सोलापुरातील मदरशाची जागा आयसोलेशन वार्डसाठी देणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!