तरुण भारत

करुळ घाटात संरक्षक कठडा ढासळला, घाट २६ जूलै पर्यंत बंद

प्रतिनिधी / गगनबावडा

सलग तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे गगनबावडा – वैभववाडी दरम्यानच्या करुळ घाटात संरक्षक कठडा ढासळला आहे.पावसाचा जोर लक्षात घेता हा घाट २६ जूलै पर्यंत बंद केल्याची माहिती गगनबावडा तहसिलदार संगमेश कोडे यांनी तरुण भारतशी बोलताना दिली.
गगनबावडा तालुक्यात काल तब्बल२०५ मिलीमीटर पाऊस पडला. तळकोकण आणि गगनबावडा दरम्यानच्या घाट परिसरात सोमवारी सकाळपासून जोरदार पाऊस झाला.

संततधार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी अशी स्थिती झाली. गगनबावड्यातून करुळ घाटात उतरताच लागणाऱ्या दुसऱ्या नागमोडी वळणावरील मोरीचा पश्चिमेकडील भाग दरीत ढासळला आहे. भराव व संरक्षक कठडा ढासळला आहे. उर्वरित अर्धवट भागातून दुपारपर्यंत एकेरी वाहतूक सुरु होती.पावसाचा वाढता जोर लक्षात घेता २६ जूलै पर्यंत घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. कोल्हापूरच्या दिशेने येणारी वाहने गगनबावड्यातून मागे परतावी लागणार आहेत.तर कणकवली तरळेकडून येणारी वाहने वैभववाडी तून परत धर्माशी लागणार आहेत.

Advertisements

Related Stories

यवतेश्वर घाटात बिबटय़ाचे दर्शन

Patil_p

आयुष्यमान, महात्मा फुलेमध्ये मेंदूवरील शस्त्रक्रियेचा समावेश करावा

Abhijeet Shinde

शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिह्यात लॉकडाऊनबाबत सुधारीत आदेश जारी

Patil_p

कोल्हापूर जिल्ह्यात आज कोरोनाने दोघांचा बळी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यात पक्षी आढळले मृतावस्थेत, बर्ड फ्ल्यूची शक्यता

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात मागील 24 तासात 137 मृत्यू; 5,609 नवे कोरोना रुग्ण 

Rohan_P
error: Content is protected !!