तरुण भारत

मारुतीच्या कार्स तिसऱयांदा महागल्या

नवी दिल्ली

मारुती सुझुकी कंपनीने आपल्या स्वीफ्टसह सीएनजीवर आधारित मोटारींच्या किमती 15 हजार रुपयांनी वाढवल्या आहेत. अंतर्गत खर्चात झालेल्या वाढीमुळे कंपनीला सदरची दरवाढ करावी लागते आहे. सदरची वाढ ही सोमवार दि. 12 जुलैपासून अंमलात येत असून ही वाढ तिसऱयांदा करण्यात आली आहे. इतर कार मॉडेल्सच्या किमती वाढवण्याचा विचार केला जात असल्याचे कंपनीने सांगितले आहे. स्वीफ्टची दिल्लीतील किंमत 5.73 लाख ते 8.27 लाख रुपये तर सीएनजीवरील आल्टो, सेलेरियो, एसप्रेसो, वॅगनआर, इको व अर्टिगा यांची किंमत 4.43 लाख ते 9.36 लाख रुपये इतकी आहे.

Advertisements

Related Stories

यामाहाची एफझेड-एक्स 18 जूनला लाँच

Amit Kulkarni

ओकीनाव्हा डय़ूअल इलेक्ट्रीक स्कूटर

Patil_p

‘अल्काझार’ने एमजी हेक्टरला टाकले मागे

Amit Kulkarni

नवी इकोस्पोर्ट एसई दाखल

Amit Kulkarni

आर्सेलर मित्तल 2 हजार कोटी गुंतवणार

Patil_p

ओला स्कूटरची प्रतीक्षा आणखीन लांबणीवर

Amit Kulkarni
error: Content is protected !!