तरुण भारत

रस्त्यांचे खड्डे भरतेय वृद्ध दाम्पत्य

पेन्शनच्या पैशातून करत आहेत काम

तेलंगणात एखादे वृद्ध दाम्पत्य रस्त्यांवरील खड्डे भरून काढत असताना दिसल्यास ते गंगाधर टिळक कटनम असल्याचे समजेल. स्वतःच्या पत्नीसोबत रस्ते दुर्घटना कमी करण्याचा प्रयत्न गंगाधर करत असतात. पेन्शनच्या पैशांमधून तेलंगणातील रस्त्यांवर असलेले खड्डे भरून काढत रस्ते दुर्घटना कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सोशल मीडियावर या दाम्पत्याच्या मोठेपणा आणि परोपकाराच्या भावनेचे कौतुक होत आहे.

Advertisements

हैदराबादमधील हे दाम्पत्य मागील 11 वर्षांपासून रस्त्यांवरील खड्डे भरून काढत आहे. भारतीय रेल्वेमधून निवृत्त झाल्यावर हे काम करू लागतो. खड्डय़ांमुळे अनेक अपघात होताना पाहिले आहेत. हा मुद्दा प्राधिकरणासमोरही उपस्थित केला, पण कुठलीच पावले उचलली न गेल्याने स्वतःच्या पत्नीसोबत या खड्डय़ांना भरू लागल्याचे गंगाधर टिळक कटनम यांनी सांगितले आहे.

रस्त्यांवरील खड्डे भरून काढण्याचा निर्णय मी स्वतः घेतला. या कामाकरता मी स्वतःच्या पेन्शनमधील रक्कम खर्च करतो. आतापर्यंत 2 हजार खड्डे भरून काढले आहेत. या कामात माझी पत्नीही मदत करते. आम्ही दोघांनी मिळून हैदराबादच्या रस्त्यांवरील खड्डे भरून काढत आहोत असे जी.टी. कटनम यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे.

Related Stories

राहुल गांधी यांनी देशवासीयांना केले लसीकरण करण्याचे आवाहन; म्हणाले…

Rohan_P

…तर एकावेळी दोन्ही आघाड्यांवर युद्ध लढू

datta jadhav

वेळीच उपचार न मिळाल्याने 30 टक्के रुग्णांचा मृत्यू

Patil_p

राजस्थानमध्ये एका दिवसात 118 नवे कोरोना रुग्ण; तर 3 जणांचा मृत्यू

Rohan_P

‘सीएए’ला तत्काळ स्थगिती नाही

Patil_p

हिजबुल कमांडरसह तीन दहशतवादी ठार

Patil_p
error: Content is protected !!