तरुण भारत

सांगली : कर्नाटकातील महिलेचा येळवीत मृत्यू

प्रतिनिधी / जत

जत तालुक्यातील येळवी येथे कर्नाटक येथील जमखंडीतील तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी पहाटे गणेश खांडेकर यांच्या घरी घडली आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन जत ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. सदरची घटना जत पोलिसांत नोंद आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येळवी येथील गणेश खांडेकर या तरुणाने एका अनोळखी महिलेला घरी आश्रय दिला होता. परंतु रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सदरच्या महिलेच्या पोटात व छातीत दुखू लागले. यात महिलेचा पहाटे मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती पोलीस पाटील यांनी पोलिसांना दिली होती. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहिते, पोलीस नाईक बजरंग थोरात, पाटोळे, पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला होता. खांडेकर या तरुणाच्या जबाबात सदरची महिला कवठेमंहकाळ येथून आणल्याची सांगितले होते. परंतु मध्यंरात्री त्रास जाणवू लागला होता. यातच तिचा मृत्यू झाला होता. यानुसार पोलिसांनी अधिक तपास केला असता कवठेमंहकाळ बसस्टँड मधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सदरची महिला दिसून आली होती व तिच्या हातात दवाखान्याची उपचार घेत असल्याची फाईल होती ती तिने टाकलेली दिसून आली होती. सदरचे दृष्य कॅमेरात कैद झाले आहे.

दरम्यान, खांडेकर यांच्या नातेवाईकांची या महिलेशी भेट झाली होती. या महिलेने आम्हाला सोबत घ्या .असे म्हणाल्याने खांडेकर यांच्याकडे ही महिला वास्तव्यास आली होती. या महिलेचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला आहे. अधिक तपास केला असता या फाईल वरून ही महिला कर्नाटक राज्यातील जमखंडी येथील असल्याचे समजले आहे यानुसार रात्री संबंधित महिलेच्या नातेवाईकांचे जबाब घेण्याचे रात्री उशिरा काम सुरू होते.या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके करत आहेत.

Advertisements

Related Stories

रेल्वे दुहेरीकरण व विद्युतीकरणाने नांद्रेतील शेतकऱ्यांवर अनेक संकटे

Abhijeet Shinde

सांगली : हरिपूर पर्यटकांचे नवे आकर्षण

Abhijeet Shinde

सांगलीच्या महापूराला अलमट्टी जबाबदार नाही – उपमुख्यमंत्री

Abhijeet Shinde

केंद्राने साखरेला प्रति क्विंटल ३,५०० रू. दर द्या : आ. मानसिंगराव नाईक

Abhijeet Shinde

हुपरीतील जैन मूर्ती लेखातून उलगडणार प्राचीन इतिहास

Abhijeet Shinde

सांगली जिल्हय़ात 34 जणांचा मृत्यू, नवे 763 रूग्ण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!