तरुण भारत

इस्लामपूरच्या डॉ. वाठारकर याची सांगली कारागृहात रवानगी

इस्लामपूर- प्रतिनिधी

उपचारा दरम्यान मृत्यू पावलेल्या वृध्द महिलेवर पुढे दोन दिवस उपचार करून आर्थिक लुबाडणुक करणारा आधार हेल्थ केअरचा डॉ.योगेश वाठारकर याला सोमवारी न्यायालयीन कोठडी देण्यात आली. दरम्यान न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळल्याने त्याची रवानगी सांगली कारागृहात झाली.

Advertisements

सायरा हमीद शेख (६०, रा.कासेगाव) या महिलेस त्यांचा मुलगा सलीम यांनी दि.२४ फेब्रुवारी रोजी डॉ.वाठारकर याच्या हॉस्पिटलमध्ये मधुमेह व रक्तदाबाच्या उपचारासाठी दाखल केले. त्या नॉनकोविड होत्या. दि.२४ फेब्रुवारी ते दि.१० मार्च या काळात वेगवेगळ्या तपासणी करुन जनरल व आयसीयू मध्ये उपचार केले. दि.८ मार्च रोजी पासून डॉ.वाठारकर याने नातेवाईकांना रुग्ण सायरा यांना भेटण्यास मनाई केली. दि.१० मार्च रोजी त्यांना मृत घोषीत करुन त्यांचा मृतदेह मुलाच्या ताब्यात दिला. मुलगा सलीम याने एक महिन्यानंतर आईच्या मृत्यूचा दाखला नगरपालिकेतून मिळवला असता, त्यामध्ये मृत्यू दि.८ रोजी झाल्याचे नमूद करण्यात आले होते. हॉस्पिटलमधील कागदपत्रावर मात्र दि. १० पर्यंत उपचार सुरु असल्याचे दिसून येत होते. पैशाच्या लोभासाठी त्याने दोन दिवस मृत आईवर उपचार केल्याचे लक्षात येताच, सलीम यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली. पोलीसांनी या प्रकरणी आरोग्य विभागाचा अभिप्राय घेतला. त्यामध्ये दोषी आढळल्याने सलीम शेख यांच्या वर्दीवरुन डॉ.वाठारकर याला अटक करण्यात आली.

गेली पाच दिवस तो पोलीस कोठडीत होता. सोमवारी पोलीसांनी त्याला न्यायालयात हजर केले. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी त्याला न्यायालयीन कोठडी दिली. दरम्यान डॉ.वाठारकर याने जामीनासाठी अर्ज केला. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे त्याची रवानगी सांगली कारागृहात करण्यात आली.

Related Stories

मिरजेत कृष्णा नदीची पाणी पातळी 53 फुटांवर; म्हैसाळ-ढवळीचा संपर्क तुटला

Abhijeet Shinde

मिरजेत कुत्र्याने चावा घेतल्याने बालकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

सांगली आयर्विन ब्रिज जवळ पाणी पातळीत सहा इंचाने घट

Abhijeet Shinde

किनरेवाडी येथे विहिरीत पडलेल्या बैलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश

Abhijeet Shinde

नेर्ले-कापुसखेड येथील बिबट्याचा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वनखात्याकडून पाहणी

Sumit Tambekar

सांगली : मिरज रेल्वे जंक्शन परिसरात नशेखोरांचा हैदोस

Abhijeet Shinde
error: Content is protected !!