तरुण भारत

नेर्लेत क्षुल्लक कारणावरून एकावर खुनी हल्ला

कासेगाव – वार्ताहर

पिण्याच्या नळाचे पाणी घराजवळ जात असल्याच्या किरकोळ कारणावरून एकावर चाकूने पोटात वार करून
खुनी हल्ला करण्यात आला. यात मयूर रामचंद्र झेंडे ( वय ३२ रा.नेर्ले ) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कराड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी महेश रंगराव कांबळे (रा.नेर्ले ) या संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे.

Advertisements

मयूर झेंडे यांच्या घराजवळ महेश कांबळे यांचे घर आहे . पावसाळ्यात व पिण्याच्या पाण्याच्या नळाचे पाणी भिंतीच्या होल मधून कांबळे यांच्या घराजवळ जाते. याचा राग धरून किरकोळ कारणावरून आज, सोमवारी सकाळच्या सुमारास महेश कांबळे याने मयुर यांस शिवीगाळ , धमकी देत धक्काबुक्की केली. जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने पोटात वार केले.

या प्रकरणी धनश्री मयूर झेंडे यांनी कासेगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. कासेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मते यांनी घटनास्थळी भेट दिली. तर, महेश गायकवाड , संग्राम कुंभार , शिवाजी यादव , दीपक घस्ते , प्रशांत मोटे , सुनील पाटील यांनी ही कारवाई केली.

Related Stories

सांगली : वाळव्यात मंत्र्याचे डिजिटल पोस्टर फाडल्याने तणावाचे वातावरण

Abhijeet Shinde

कृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता

Abhijeet Shinde

मिरज रेल्वे जंक्शनवर रिक्षा स्टॉपला परवानगी द्या

Abhijeet Shinde

मिरजेत नशेखोर तरुणांनी चारचाकी जाळली

Abhijeet Shinde

सांगली मनपा मालमत्ता नोंदणी अधिकारी पदी शेखर परब

Abhijeet Shinde

बेळंकीतील पोलीस कुटुंब आत्महत्या प्रकरणी 14 जणांवर सावकारीचा गुन्हा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!