तरुण भारत

किरकोळ महागाई दर 6.26 टक्के

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

जून 2021 या महिन्यात किरकोळ महागाई दरात 6.26 टक्क्यांची वाढ झाली आहे. मेमध्ये ही वाढ 6.3 टक्के होती. ग्राहक दर निर्देशांकावर (सीपीआय) आधारित महागाई दरातील ही वाढ रिझर्व्ह बँकेच्या वाजवी अनुमानापेक्षाही जास्त असल्याने ही चिंतेची बाब आहे, अशी प्रतिक्रिया तज्ञांनी व्यक्त केली. रिझर्व्ह बँकेने महागाई दरवाढीची मर्यादा 4 टक्के निर्धारित केली आहे. यात सकारात्मक किंवा नकारात्मक दोन टक्क्यांचे परिवर्तन होऊ शकते. पण सध्याचा महागाई दर हा या अधिकतर मर्यादेपेक्षाही जास्त आहे. अन्नधान्य व इतर अन्नपदार्थांच्या महागाई दरात जास्त वाढ झाल्याने एकंदर महागाई दरात वाढ झाली आहे.

Advertisements

Related Stories

शहापूर कंडी प्रकल्प नोव्हेंबर 2022 पर्यंत पूर्ण होणार

datta jadhav

दिल्लीच्या शेतकऱ्याने शोधला ‘पराली’वर उपाय

Patil_p

थ्री इडियट्सवाल्या ‘रँचो’ची कमाल

Patil_p

बजरंग पुनियाची उपांत्य फेरीत धडक

datta jadhav

देशात आणखी 18 हजार बाधित

datta jadhav

”उंच गुढ्यांमध्ये एक गुढी करोनामुक्तीच्या विजयाचीही असो”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!