तरुण भारत

पावसाने गोव्याला झोडपले

सांखळी, डिचोलीत नद्यांच्या पातळीत वाढ : मोसमात आतापर्यंत 45.50 इंच पाऊस

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

पावसाने रविवारी संपूर्ण गोव्याला झोडपून काढले. सोमवारी सकाळपर्यंत नॉनस्टॉप पाऊस संततधार चालूच होता. विविध भागात मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे सांखळी, डिचोली येथील नद्या धोक्याच्या पातळीवर जाऊन पोहोचल्या. मात्र सोमवारी दुपारी पावसाचा जोर थोडा ओसरला त्यामुळे मोठय़ा पुराचा धोकाही कमी झाला.

गेल्या 24 तासांत सर्वाधिक 7.5 इंच पाऊस पेडणेत झाला. जुने गोवे येथे 7 इंच, सांखळीत 6 इंच, वाळपईत 5 इंच. पणजी, केपे प्रत्येकी 4.5 इंच. सांगे येथे 3.5 इंच तर काणकोणमध्ये 3 इंच पावसाची नोंद झाली.

राज्यात 15 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस

दि. 15 जुलैपर्यंत राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला. यापूर्वी हवामान खात्याने दिलेल्या इशाऱयानुसार रविवारी जोरदार पावसाने संपूर्ण गोव्याला झोडपून काढले. रविवारी सकाळीपासूनच सुरु झालेल्या पावसने दुपारनंतर थोडी विश्रांती घेतली. मात्र त्यानंतर सायंकाळपासून सुरु झालेला पाऊस सोमवारी दुपारी थांबला. सोमवारी काही भागात दुपारी मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त आहे.

सांखळी, डिचोलीत नद्यांच्या पातळीत वाढ

पुढील 48 तासांत सर्वत्र जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या पावसामुळे सांखळीच्या वाळवंटी व डिचोलीच्या नदीच्या पाण्याची पातळी वाढली व ती पात्राबाहेर पाणी पोहोचले थोडक्यात पुरसदृष्य अशी स्थिती निर्माण झाली. मात्र दुपार नंतर पावसाचा जोर मंदावला व पूर ओसरला. हवामान खात्याने सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार स. 8.30 ते सांय 5.30 या दरम्यान पणजीत 13 मि.मी. अर्थात अर्धा इंच पावसाची नेंद झाली.

जुलैमधील या विक्रमी पावसामुळे वार्षिक असणारी सरांसरी पावसाने गाठली. यंदाच्या मौसमात आतापर्यंत 45.50 इंच पाऊस झाला असून हा पाऊस अत्यंत समाधानकारक आहे.

Related Stories

गोवा फॉरवर्डच्या नेत्यांचा मुरगाव तालुक्यात प्रवेश, राजकीय चाचपणी सुरू

Amit Kulkarni

कुडतरीच्या आमदारांनी केली होती मागणी

Omkar B

वास्को मायमोळेतील नियोजित हिंदु स्मशानभूमीच्या जमीनीचे क्षेत्र बदलण्याचे षडयंत्र

Omkar B

गोव्याची सांस्कृतिक ओळख काँग्रेस पक्ष राखून ठेवणार

Amit Kulkarni

रिव्होल्युशनरीचे सरकार आणा, पहिल्याच अधिवेशन पोगो बिल आणू

Amit Kulkarni

केंद्रीय सशक्तीकरण समितीने दिलेल्या अहवालाचे गोवा फॉरवर्डकडून स्वागत

Amit Kulkarni
error: Content is protected !!