तरुण भारत

गोकाक फॉल्ससाठी विशेष बससेवा

सुट्टीच्यादिवशी वाढतोय पर्यटकांचा प्रतिसाद

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

मध्यवर्ती बसस्थानकातून वर्षा पर्यटनासाठी विशेष बससेवा सुरू करण्यात आली  आहे. हिडकल डॅम, गोडचिनमलकी आणि गोकाक फॉल्ससाठी ही बससेवा सुरू आहे. या बससेवेला सुट्टीच्यादिवशी पर्यटकांचा प्रतिसाद वाढत आहे. केवळ  शनिवारी, रविवारी व सरकारी सुट्टीच्या दिवशी ही बससेवा उपलब्ध आहे. सकाळी 9 वाजता बसस्थानकातून गोकाककडे धावत आहे. विशेष बससेवा सवलतीच्या दरात म्हणजे केवळ 180 रूपयांत हिडकल डॅम, गोडचिनमलकी आणि गोकाक फॉल्ससाठी धावत आहे.

जून महिन्यात झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा, वर्षा पर्यटनाचा आंनद लुटता यावा यासाठी बेळगाव आगारातून ही विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. ही बससेवा हिडकल डॅम, गोडचिनमलकी, गोकाक फॉल्स या पर्यटन स्थळांना भेट देऊन परत सायंकाळी बेळगाव स्थानकात पोहोचणार आहे. या प्रवासासाठी तिकिट बसस्थानकात किंवा या www.ksrtc.in वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 7760991612 किंवा 7760991625 या मोबाईल क्रंमाकवर संपर्क साधावा, असे परिवहन मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.

Related Stories

अरबाज खून प्रकरणाचे रहस्य उलगडले

Amit Kulkarni

सामान्य कंत्राटदारांसाठी लहान पॅकेजची कामे उपलब्ध करा

Patil_p

प्रतिमा कुतिन्होच्या विरोधात गुन्हा दाखल

Patil_p

इनरव्हील क्लबतर्फे आराधना शाळेमध्ये भेटवस्तूंचे वितरण

Amit Kulkarni

मुतगा ग्रा. पं. अध्यक्षपदी भालचंद्र पाटील

Amit Kulkarni

स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या 16 स्केटर्सचे यश

Amit Kulkarni
error: Content is protected !!