तरुण भारत

ब्रेड उत्तप्पा

ब्रेडपासून विविध पदार्थ करता येतात.  ब्रेडचा वापर करून उत्तप्पाही करता येईल. पावसाळ्यात गरमागरम उत्तप्पा खाण्याची मजा काही औरच म्हटली पाहिजे. 

साहित्य : पाच ब्रेड स्लाईस, एक कप रवा, अर्धा कप दही, एक कांदा बारीक चिरून घ्या, बारीक चिरलेला टोमॅटो, आल्याची पेस्ट अर्धा चमचा, एक चमचा तिखट, दोन हिरव्या मिरच्या(बारीक चिरून घ्या), कोथिंबिर, मीठ आणि तेल.

Advertisements

कृती : ब्रेडचे तुकडे करून घ्या. एका पातेल्यात ब्रेडचे तुकडे, रवा आणि दही घालून सर्व घटक नीट मिसळून घ्या. गरजेनुसार पाणी घाला. आता हे मिश्रण दहा मिनिटं बाजूला ठेवा. त्यानंतर ते मिक्सरच्या भांडय़ात काढून वाटून घ्या. पुन्हा भांडय़ात काढून घ्या. आता या मिश्रणात कांदा, टोमॅटो, मिरची, आल्याची पेस्ट, तिखट, मीठ आणि कोथिंबिर घाला आणि  मिश्रण फेटून घ्या. मिश्रण जास्त घट्ट वाटल्यास थोडं पाणी घाला. आता गॅसवर तवा ठेवा. त्यावर थोडं तेल लावा. मग उत्तप्पे घालायला सुरूवात करा. दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. चटणीसोबत खायला द्या.

Related Stories

थंडगार गुलाब फिरनी

Omkar B

बटाटा बिर्याणी

Omkar B

भरवा पनीर

Omkar B

कोझुकट्टाई

tarunbharat

दही तडका

Omkar B

सुपरफूड

tarunbharat
error: Content is protected !!