तरुण भारत

सौर वादळ कोणत्याही क्षणी पृथ्वीवर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

सूर्याच्या उर्जेपासून तयार झालेले सौर वादळ मंगळवार-बुधवार (दि.13-14) दरम्यान कोणत्याही क्षणी पृथ्वीवर येण्याची शक्यता आहे. याचा परिणाम जीपीएस प्रणाली, मोबाइल नेटवर्क आणि सॅटेलाइट टीव्हीवर होऊन या सेवा विस्कळीत होऊ शकतात.

Advertisements

3 जुलै रोजी सूर्याच्या दक्षिण भागात मोठा स्फोट झाला होता. त्यामुळे सौर किरणे वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहेत. मंगळवार-बुधवार  दरम्यान ते पृथ्वीवर कोणत्याही वेळी दाखल होऊन काही मिनिटे धोका निर्माण करू शकतात. या वादळामुळे पृथ्वीचे बाह्य वातावरण गरम होऊ शकते. उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर मोठा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे. येथे रात्रीच्या वेळी दिवसासारखा प्रकाश दिसू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नासाच्या अंदाजानुसार, सौर वादळ सोळा लाख किमी प्रति तास वेगाने पृथ्वीकडे येत आहे. वातावरणावर याचा परिणाम होणार असून अनेक शहरातील वीज पुरवठा खंडित होणार आहे.

Related Stories

पत्रकार रोहित सरदाना यांचे हार्ट ऍटॅकने निधन

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये 574 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

तणावावर रामबाण सिंगोनियम वनस्पती

Patil_p

केंद्र सरकारचा पुन्हा शेतकऱयांसमोर प्रस्ताव

Omkar B

बिहारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप घोषित

Patil_p

इस्रो हेरगिरी प्रकरणी सीबीआयने कारवाई करावी

Patil_p
error: Content is protected !!