तरुण भारत

मोफत-मुक्त इंटरनेटबाबत चिंता

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचे प्रतिपादन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

मोफत आणि खुल्या इंटरनेटवर हल्ले वाढत असल्याने भविष्यामध्ये सुरक्षेबाबत चिंता निर्माण होण्याची शक्यता असल्याचे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांनी एका न्यूज चॅनेलवर बोलताना म्हटले आहे. विविध देशांमध्ये माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास अडथळे आणले जात आहेत.

इंटरनेटचे भविष्य हे कोणत्याही देशाच्या सरकारसाठी किंवा एखाद्या व्यक्तिसाठी मर्यादीत स्वरूपात राहू नये, असे मत पिचाई यांनी व्यक्त करत याबाबतची जबाबदारी सामूहिक तत्वावर घेतली जायला हवी. आजघडीला वापरकर्त्यांनी आपल्या फोनवर ऑपरेटिंग सिस्टम नेहमी अपडेट करत राहणे आवश्यक आहे. यात आपल्याला नव्या सुविधांचा लाभ तर मिळतोच पण दुसरीकडे सुरक्षाही राखली जाते. मोबाइलमधील ऑपरेटिंग सिस्टम अपडेट केल्याने फोनमधील व्हायरसही काढला जातो, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

‘ओला’ 2 हजार 400 कोटी रुपये गुंतवणार

Patil_p

रिलायन्सच्या मुकेश अंबांनींकडून निर्णयाचे स्वागत

Amit Kulkarni

आशियातील तांदळाच्या किमती सात वर्षांच्या उच्चांकावर

Patil_p

इंडिगो, गोएअरना इंजिन्स बदलण्याचे आदेश

Patil_p

स्टेट बँकेवर दोन एमडींच्या नियुक्तीला मंजुरी

Amit Kulkarni

मलबार ग्रुप करणार 750 कोटींची गुंतवणूक

Patil_p
error: Content is protected !!