तरुण भारत

लॉस्ट’मधून झळकणार यामी गौतम

भूत पुलिस चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेली अभिनेत्री यामी गौतमने स्वतःच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. लॉस्ट या चित्रपटात यामी दिग्गज अभिनेते पंकज कपूर आणि राहुल खन्ना यांच्यासोबत दिसून येणर आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी करणार आहेत. त्यांनी यापूर्वी पिंक या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी यापूर्वी फॉरबिडन लव्ह या मिनी सीरिजचे दिग्दर्शन केले होते.

यामीने चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावरून केली आहे. चित्रपटात नील भूपलम, पिया वाजपेयी आणि तुषार पांडे हे कलाकार देखील दिसून येणार आहेत. चित्रपटाची निर्मिती झी स्टुडियोज आणि नमः पिक्चर्सकडून केली जात आहे. लॉस्ट चित्रपटाची कथा कोलकाता शहरावर आधारित आहे. यामी यात क्राइम रिपोर्टरची व्यक्तिरेखा साकारत आहे.

Advertisements

लॉस्ट हा चित्रपट इन्व्हेस्टिगेटिव्हा ड्रामा असला तरीही यात कमिटमेंट, जबाबदारी आणि जगाला सुंदर करण्याचा संदेश असल्याचे अनिरुद्ध यांनी म्हटले आहे. यामी गौतमचा भूत पुलिस हा चित्रपट 17 सप्टेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार व्हीआयपीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात यामी, सैफ अली खान, जॅकलीन फर्नांडिस आणि अर्जुन कपूर हे कलाकार आहेत.t

Related Stories

अभिनेता वृषभ शाहने केले धान्य वाटप…

Patil_p

श्रेयस तळपदेच टेलिव्हिजनवर पुनरागमन

Patil_p

प्लॅनेट मराठी करणार सहा नव्या चित्रपटांची निर्मिती

Patil_p

‘मॅडम सर’चे नवीन एपिसोड्ससह पुनरागमन!

Patil_p

ज्येष्ठ लोककलावंत कांताबाई सातारकर यांचं निधन

Abhijeet Shinde

दिग्दर्शक संजय जाधव यांची प्लॅनेट टॅलेंटमध्ये एन्ट्री

Patil_p
error: Content is protected !!