तरुण भारत

युरो 2020 सर्वोत्तम संघात इटलीचे पाच खेळाडू

वृत्तसंस्था/ लंडन

नुकत्याच झालेल्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील खेळाडूंची कामगिरी पाहून युरो 2020 संघाची घोषणा युरोपियन फुटबॉलवर नियंत्रण ठेवणाऱया युफाने केली आहे. या संघात विजेत्या इटली संघातील पाच व उपविजेत्या इंग्लंड संघातील तीन खेळाडूंना स्थान मिळाले आहे.

Advertisements

इटलीचा गोलरक्षक जियानलुईगी डोनारुमासह डिफेंडर्स लिओनार्दो बोनुसी, लिओनार्दो स्पिनाझोला, मिडफिल्डर जॉर्गिन्हो व विंगर फेडरिको चिएसा यांनाही या संघात निवडण्यात आले आहे. गोलरक्षक डोनारुमाला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमानही मिळाला आहे. पेनल्टी शूटआऊटमधील त्याच्या अप्रतिम कामगिरीमुळेच इटलीला 1968 नंतर प्रथमच या स्पर्धेचे जेतेपद पटकावता आले. इंग्लंडचा राईटबॅक काईल वॉकर, सेंटरबॅक हॅरी मॅग्वायर, आघाडीवीर रहीम स्टर्लिंग यांनाही या सर्वोत्तम संघात निवडण्यात आले आहे. युफाच्या तांत्रिक निरीक्षण समितीने या संघाची निवड केली आहे. स्पेनचा मिडफिल्डर पेड्री, डेन्मार्कचा पीयरे एमिले हॉजबर्ग, बेल्जियमचा रोमेलू लुकाकू यांनाही या संघात स्थान मिळाले आहे. यापैकी पेड्रीला स्पर्धेतील सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार मिळाला. इंग्लंडच्या स्टर्लिंगने स्पर्धेत तीन गोल नोंदवले तर बेल्जियमच्या लुकाकूने चार गोल केले. बेल्जियमला उपांत्यपूर्व फेरीत इटलीकडूनच पराभूत व्हावे लागले होते.

Related Stories

मल्ल सनी जाधवला आर्थिक साहय़

Amit Kulkarni

डेव्हिड वॉर्नर बहरात, ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रीलंकेचा फडशा

Amit Kulkarni

युवराज सिंगविरूद्ध एफआयआर दाखल

Patil_p

मुंबईच्या विजयात जैस्वालची चमक

Patil_p

कॅनडा, युएई, पापुआ न्यू गिनिया यू-19 वर्ल्ड कपसाठी पात्र

Amit Kulkarni

दोन बॅडमिंटन स्पर्धा रद्द करण्याचा बीडब्ल्यूएफचा निर्णय

Patil_p
error: Content is protected !!