तरुण भारत

मलेशिया,सिंगापूर, ब्राझील सुधारित जातीच्या फणसाच्या 450 झाडांची सत्तरीत होणार लागवड

प्रतिनिधी /वाळपई

 सत्तरी तालुक्मयात फणसाच्या झाडांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. मात्र या फणसाच्या फळापासून व्यवहारी दृष्टिकोन अजूनही विकसित झालेला नाही .यामुळे मोठय़ा प्रमाणात फणसाचे नुकसान होताना दिसत आहे. हल्लीच्या काळात काही प्रमाणात काही निवडक शेतकरी बंधूनी फणसाच्या पासून वेगवेगळय़ा स्तरावर ऊत्पादने तयारी करण्याचे काम सुरु केलेली आहे. त्याचप्रमाणे काही महिला सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून फणसाच्या वेगवेगळय़ा वापरातून वेगवेगळय़ा प्रकारची उत्पादने व पदार्थ बनविण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे .मात्र वाळपई विभागीय कृषी कार्यालयाच्या माध्यमातून भविष्यात सत्तरी तालुक्मयात फणसाच्या नवीन जातीचे लागवड करण्यात येणार आहे .मलेशिया सिंगापूर ब्राझील वियतनाम आदी भागातील विकसित फणसाच्या झाडांच्या रोपांचे सत्तरी तालुक्मयात जवळपास साडेचारशे झाडांची लागवड करण्यात येणार आहे. या बाबतीत वाळपई विभागीय कृषी कार्यालयाने मिशन हाती घेतले असून या झाडांचे वितरण नुकतेच वाळपई विभागीय कृषी कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. यामुळे येणाऱया काळात गेल्या अनेक वर्षापासून वापरात असलेली पारंपरिक पळसाचे झाडे यामध्ये आता फणसाच्या नवीन चविष्ट वर्षातून दोन वेळा लागणाऱया डिंक विरहित फणसाच्या झाडांची भर पडणार आहे.

Advertisements

याबाबतची माहिती अशी की महाराष्ट्र रत्नागिरी लांजा येथील मिथिलेश देसाई यानी वेगवेगळय़ा प्रकारच्या नवीन पद्धतीच्या फणसाच्या झाडाचे निर्मिती केलेली आहे. जॅक प्रूट किंग म्हणून ओळखल्या जाणाऱया  देसाई यांनी गोव्याच्या बाजारपेठेतही मोठय़ा प्रमाणात नवीन पद्धतीच्या फणसाच्या झाडांचे उत्पादन उपलब्ध करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरू केलेले आहेत. विभागीय कृषी आलेल्या याला चांगल्या प्रकारचे सहकार्य दिलेले आहे. यामुळे सत्तरी तालुक्मयात जवळपास साडेचारशे झाडांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय कृषी कार्यालयाचे अधिकारी विश्वनाथ गावस यांनी दिली.

450 रोंपाचे वितरण.

याबाबत अधिक माहिती देताना विश्वनाथ गावस यांनी सांगितले की सत्तरी तालुक्मयात एकूण दहा वेगवेगळय़ा पद्धतीच्या सुधारित जातींचे वितरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात जातीच्या फणसाच्या जातीचे विक्री करण्यात येणार असल्याचे संदेश शेतकऱयांना पाठविण्यात आल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभला.

यासंदर्भात अभ्यासक कार्यशाळा नुकतीच विभागीय कृषी कार्यालयात संपन्न झाली .यामध्ये नवीन पद्धतीच्या फणसाच्या झाडाची लागवड व त्यांचे व्यवस्थापन व बाजारपेठेत उपलब्ध असलेली मागणी यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे .देसाई यांनी शेतकऱयांनी विचारलेल्या वेगवेगळय़ा प्रश्नांना समर्पक स्वरुपची उत्तरे दिली

झाडांचे उत्पादन डिसेंबर पासून सुरू होते.

याबाबत अधिक माहिती देताना विभागीय कृषि अधिकारी विश्वनाथ गावस यांनी सांगितले की या सुधारित जातींची अनेक चांगले गुणधर्म आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्याला चांगल्या प्रकारची बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी या जातीच्या फणसाचे उत्पादन डिसेंबर महिन्यापासून सुरू होते. त्यामुळे चांगल्या प्रकारची बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी मदत होत असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. पारंपारिक फणसाच्या उत्पादन हे बऱयाच प्रमाणात उशिरा सुरू असते. यामुळे पावसाळय़ात त्यांना चांगल्या प्रकारचा दर प्राप्त होत नाही .यामुळे सत्तरी तालुक्मयात पारंपरिक  फणसाची  उत्पादनाची नाशाडी होत असल्याचे आतापर्यंत समोर आलेले आहे. यामुळे अशा प्रकारच्या फणसाच्या झाडांची लागवड येणाऱया काळात शेतकरी बांधवांसाठी आर्थिक स्तरावर चांगल्या प्रकारचे पाठबळ देण्यासाठी ठरणार आहे.

चार वर्षांत फळधारणा सुरू होते.

या सुधारित झाडांचे विशेष म्हणजे जवळपास चौथ्या वषी या झाडाला फळ धारणा सुरू होत असते. एकूण पारंपारिक फणसाला किमान आठ वर्षे फळधारणा होण्यासाठी वेळ काढावा लागतो. मात्र या सुधारित जातीमध्ये चांगल्या प्रकारचे झाडांचे व्यवस्थापन केल्यास तिसऱया वर्षापासून फळधारणेच्या प्रारंभ होत असतो. यासाठी शक्मय तो सेंद्रिय खतांचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा प्रकारचा खतांचा वापर केल्यास फणसाच्या उत्पन्नाची चव कायम राहते असे यावेळी गावस यांनी सांगितले.  त्याचप्रमाणे स्थानिक व राष्ट्रीय बाजारपेठेत या फळांना मोठय़ा प्रमाणात मागणी असल्यामुळे अशा प्रकारची लागवड शेतकऱयांसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकते।

लाल,नारंगी, पिवळे गरे जास्त आकर्षक.

या सुधारित जातीमध्ये  विविध रंगाचे   गरे  असतात .यात खासकरून लाल, नारंगी ,पिवळा गऱयाना अधिक पसंती आहे .दिसण्यासाठी  अत्यंत आकर्षक असलेले गरे हे खवय्यांसाठी जास्त रुचकर लागतात. यामुळे अशा प्रकारच्या फणसांच्या झाडांना चांगली मागणी असल्याचे त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले. दुसरी महत्त्वाची बाब अशी की काही सुधारित जाती या वर्षातून दोनवेळा उत्पादने देत असतात .यामुळे फक्त एप्रिल, मे ,जून या महिन्यांमध्ये फणसाच्या गऱयांचा आनंद खवय्ये घेत होते आता मात्र वर्षातून दोनवेळा या गऱयांचा मनसोक्त आनंद आपल्याला घेता येणार आहे.

Related Stories

स्वतः पिकविलेल्या फळ-भाज्या देतात आंतरिक समाधान…

Omkar B

सर्वदानामध्ये रक्तदान हे सर्वात श्रेष्ट दानः उमेश तळवणेकर

Amit Kulkarni

तिसऱया लाटेविरुद्ध सरकारची सर्व सज्जता

Amit Kulkarni

विजसाठी केजरीवाल मॉडल सर्वांत उत्तम

Patil_p

विजय सरदेसाईंकडून ऑक्सिजन पेढीची घोषणा

Amit Kulkarni

मेरशीत विषप्रयोगाने खारफुटीचा संहार

Amit Kulkarni
error: Content is protected !!