तरुण भारत

डिलायलाच का मंत्री मायकल लोबोनीही शिवोलीतून निवडणूक लढवावी- विनोद पालयेकर

प्रतिनिधी /म्हापसा

पत्नी डिलायला लोबोच कशाला. मंत्री मायकल लोबो यांनीही शिवोली मतदारसंघातून निवडणूक लढवावी. निवडणुका लढविण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. शिवोलीत डिलायला लोबो यांचे स्वागतच आहे. सर्व शिवोलकार आपल्याबरोबर dसून यूतीचे उमेदवार म्हणून तिकीट आपल्यालाच मिळेल अशी माहिती शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Advertisements

कै. उदय पालयेकरांची पूण्याई आपल्या पाठिशी

मी माझ्या शिवोली मतदारसंघात आतापर्यंत भरघोस विकास कामे केलेली आहेत त्यामुळे स्थानिक जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितले. मागच्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही आपण गोवा फॉरवर्ड पक्ष ज्या पक्षाशी युती करेल त्या पक्षाचा अर्थातच युतीचा उमेदवार म्हणूनच आपण निवडणूक लढविणार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. दरम्यान मागच्या निवडणुकीत आपम राजकारणात नवखा होतो मात्र राजकारणातील खाच खळगे तसेच डावपेच शिकलो असल्याचा दावा करतानाच आपल्या पाठीशी आपल्या दिवंगत भाऊ उदय पालयेकर यांची पुण्याई असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.

दरम्यान आपण आपल्या गोवा फॉरवर्ड पक्षाशी प्रामाणिक असून पक्षाचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेला सामान्य माणूस आहे. मला आतापर्यंत कुणाही अन्य पक्षाकडून कुठलीही ऑफर आलेली नसून त्या केवळ अफवाच असल्याचे पालयेकर यांनी सांगितले. शिवोलीतील रस्त्यांचे येत्या ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत नव्याने डांबरीकरण करण्यात येणार असल्याने उर्वरीत विकास कामांचाही झपाटा लावला जाणार आहे. त्यामुळे यापुढे कुणाच्याही तक्रारींना जागा राहाणार नसल्याचे पालयेकर यांनी निक्षून सांगितले.

Related Stories

खनिजमालप्रकरणी निवाडय़ाचे श्रेय घेण्याचा भाजपकडून प्रयत्न

Patil_p

पेडणे पोलिसांनी दुचाकी चोरटय़ास अटक

Amit Kulkarni

गरीबांसाठी फोंडय़ात ‘फूड बँक’ सुरु

Patil_p

महाराष्ट्र सरकारला आम्ही प्रत्युत्तर देणार नाही

Omkar B

वेतनाच्या मागणीसाठी मुरगाव पालिका कामगार दुसऱया दिवशीही संपावर,

Amit Kulkarni

जीपीएससीकडून पात्र उमेदवारावर अन्याय

Amit Kulkarni
error: Content is protected !!