तरुण भारत

कीर्तन विश्व कार्यक्रमात आज सुहासबुवांचे कीर्तन

प्रतिनिधी /फोंडा

विश्व मराठी परिषदेच्या कीर्तन विश्व या यूटय़ुब माध्यमातील कार्यक्रमात गोव्यातील प्रसिद्ध किर्तनकार ह. भ. प. सुहासबुवा वझे यांचे कीर्तन व गोव्यासंबंधी मुलाखत प्रसारित होणार आहे. 15, 17 आणि 18 जुलै या दिवशी हा कार्यक्रम प्रसारित होणार असून त्यात वझेबुवा कीर्तन सादर करतानाच मुलाखतीच्या माध्यमातून गोव्याची संस्कृती व येथील उत्सव परंपरेवर बोलणार आहेत.

Advertisements

महाराष्ट्रातील एकूण 52 नामवंत किर्तनकारांचा या कार्यक्रमात सहभाग असून गोव्यातून सुहासबुवा वझे हे एकमेव किर्तनकार या कार्यक्रमात कीर्तन सादर करणार आहेत. यूटय़ुबच्या माध्यमातून हा कार्यक्रम भारताबरोबरच जगभरातील विविध देशातील कीर्तनप्रेमीपर्यंत पोचणार आहे. वझेबुवांना पुण्याचे कौस्तुभ परांजपे हार्मोनियमवर तर गजानन माऊली व मिलिंद तायवडे हे तबल्यावर तसेच गोव्यातील रुद्राक्ष वझे झांज व दामोदर कामत चिपळीवर साथ करणार आहेत.

Related Stories

14 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

Patil_p

‘ओरा ब्राइडल ज्वेलरी’ शो-रूमचे मडगावात उद्घाटन

Amit Kulkarni

कुंभारजुवेतील लोकांना सर्व ती मदत करणार

Amit Kulkarni

फोंडा तालुक्यातील रुग्णांना ‘दिलासा’ नाहीच !

Patil_p

ग्राहक कमी भाजीचे दर चढेच

Omkar B

‘लॉकडाऊन’चा राज्यातील काजू उत्पादकांना फटका

Patil_p
error: Content is protected !!