तरुण भारत

डेल्टा साठी तिसरा डोस

कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटमुळे इस्राईलसारखे देश आता नवीन लाटेचा सामना करत आहे. या देशांमध्ये लसींचे दोन डोस घेतलेल्या लोकांना कोरानाची लागण झाली. सहा महिन्यातच इम्यूनिटी घसरल्याचे निदर्शनास आले.  जगात कोरोनाच्या हॉटस्पॉट ठरलेल्या इंडोनेशियात डॉक्टर आणि अन्य आराग्य कर्मचार्यांच्या मृत्युचे प्रमाण वाढत चालले आहे. या स्थितीवर मार्ग काढण्यासाठी आता तिसर्या डोसची तयारी केली जात आहे.

  • या डोसला शास्त्रज्ञांनी अधिक सक्षम केले आहे. अमेरिकी लस निर्माते फायझर बायोएनटेकने बूस्टर डोसच्या चाचणीचे सुरवातीचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. त्यास पुढील महिन्यात मंजूरी मिळण्यासाठी शक्यता आहे.
  • फायझर-बायोएनटेकची सध्या बूस्टर डोसचा प्रभाव जाणून घेण्यासाठी चाचणी सुरू आहे. त्याच्या सुरवातीच्या आकडय़ांवरून लशीचा तिसरा डोस कोरोनाच्या विविध प्रकाराविरोधात अँटीबॉडीला दोन डोसच्या बदल्यात पाच ते दहा टक्के वाढ करेल.फायजरच्या चाचणीचा अहवाल आणि विवेचन लवकरच प्रकाशित होणार आहे. ऑगस्टच्या शेवटपर्यंत कोरोनाविरोधात सुरक्षा प्रदान करणारा पहिला बुस्टर डोस उपलब्ध होणार आहे.
  • डेल्टाशी लढाई करण्यासाठी एकीकडे उपलब्ध लसीचा बुस्टर डोस तयार केला जात आहे तर दुसरीकडे विशेष लसही तयार होत आहे. वैशिष्टयेपूर्ण लसीची पहिली बॅच जर्मनीत तयार होत आहे.

Related Stories

बॉटल एक्सरसाईज !

Omkar B

मुलांमधील पाठदुखी

Amit Kulkarni

लस आवश्यकच: पण …..

Omkar B

टॉन्सिलायटीसचा सामना करताना

Amit Kulkarni

उन्हाळ्यातील नेत्रदक्षता

tarunbharat

प्रीमॅच्युअर बेबींमधील आजार

Omkar B
error: Content is protected !!