तरुण भारत

स्टार्चयुक्त पदार्थ खातंय

  • एका नव्या अभ्यासानुसार जेवणामध्ये सातत्याने बटाटे किंवा अन्य स्टार्चयुक्त स्नॅक्सचे सेवन केल्यास मृत्युदराची जोखीम ही 50 टक्क्यांपर्यंत आणि हृदयविकारांची जोखीम ही 44 ते 57 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.
  • एका नव्या अभ्यासानुसार हे दिसून आले आहे. याउलट भोजनात फळ, भाजीपाला, डेअरी उत्पादनांचे सेवन केल्यास हृदयरोग, कर्करोग किंवा अन्य कोणत्याही कारणांमुळे होणार्या मृत्युची जोखीम कमी होऊ शकते.
  • चीनच्या हार्बिन मेडिकल युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे प्रोफेसर यिंग ली  आणि त्याच्या सहकार्यांनीं सर्व प्रकारच्या भोजनाचे आकलन करण्यासाठी अमेरिकेत 2003 ते 2014 पर्यंत  21,503 जणांवरील परिणामांचा अभ्यास केला. या अभ्यासात 51 टक्के महिला होत्या. सर्व सहभागी स्वयंसेवकाचे वय हे तीसपेक्षा अधिक होते. त्यानंतर सीव्हीडी, कॅन्सर किंवा कोणत्याही अन्य कारणांमुळे 31 डिसेंबर 2015 पर्यंत मृत्युमुखी पडलेल्या स्वयंसेवकांच्या स्थितीचे आकलन करण्यासाठी अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या नॅशनल डेथ इंडेक्सचा वापर केला.
  • संशोधकांनी सहभागी स्वयंसेवकांच्या डायट पॅटर्नचे विश्लेषण केले. त्याची विभागणी केली. भोजनात कोणत्या प्रकारच्या पदार्थाचे सेवन केले, याचे आकलन केले. मुख्य भोजनासाठी सकाळच्या भोजनातील तीन मुख्य डायट पॅटर्न निश्चित केले. वेस्टर्न ब्रेकफास्ट, स्टार्च ब्रेकफास्ट आणि फ्रूट ब्रेकफास्ट अशी विभागणी केली.
  • या संशोधनातून आढळून आले, की  कोणत्याही भोजनात अथवा नंतर स्टार्चयुक्त फराळ केल्याने मृत्युदरात 50 ते 52 टक्के वाढ होते. तसेच सीव्हीडीशी निगडीत मृत्युदरातही 44 ते 57 टक्के वाढ दिसून आली.
  • स्टार्चयुक्त पदार्थ हे पनचासाठी जड मानले जातात. आयुर्वेदामध्येही बटाटय़ासारखा स्टार्चसमृद्ध पदार्थ हा वातूळ आणि मेदवृद्धी करणारा गणला जातो. लठ्ठपणा, मधुमेहाची समस्या असणार्यांना बटाटा वर्ज्य करण्याचा सल्ला दिला जातो.

Related Stories

प्रतिकारशक्तीची त्रिसूत्री

Omkar B

गांधीजींचा पथ्याहार

Omkar B

समस्या ऱ्हुमेटॉइड आर्थ्रायटिसचा

tarunbharat

टक्कल पडलेल्यांना दिलासा

Omkar B

पतंजली आज लाँच करणार कोरोनावरील औषध

datta jadhav

हस्तोत्तानासनचे फायदे

Amit Kulkarni
error: Content is protected !!