तरुण भारत

जेवणानंतर चहा घेताय

काजोलची मोठी बहिण तनिषा मुखर्जीने अलीकडेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून तिने एक कप गरमागरम चहाचा उल्लेख केला आहे. यात ती म्हणते की, मला जेवणानंतर चहा घेणे खूपच आवडते. डेझर्टएवजी चहा मला गोड आहे. परंतु ही सवय चांगली आहे काय? हे जाणून घ्यायला हवे.

  • आरोग्याचा विचार केल्यास खाण्यानंतर चहा घेणे हे सर्वार्थाने चुकीचे आहे. चहामध्ये कॅफिन असल्याने भोजनानंतर त्याचे सेवन केल्यास रक्तदाब वाढतो. कॅफीन शरिरातील कॉर्टिसोल म्हणजेच स्टेरॉइड हार्मोन्स वाढवते. त्यामुळे  अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो.
  • कॅफिनशिवाय चहात पॉलिफेनोल्स आणि टेन्सिसारखे तत्त्व आढळून येतात. हे भोजनापासून शरीराला मिळणार्या लोहसत्त्वाला अडथळे आणतात. चहाची खूपच तलफ असेल तर त्याऐवजी ग्रीन टीचे सेवन करु शकता.
  • चहापत्तीत ऍसिडिक गुण असल्यामुळे अन्नातील  प्रोटीनचा शरीराला पूर्ण लाभ मिळत नाही.
  • जेवणानंतर तात्काळ चहा घेतल्यानंतर पचनशक्तीवर परिणाम होतो.  जेवणातील पौष्टीक तत्त्वांची गुणवत्ता कमी होते.
  • जेवणानंतर दररोज चहा किंवा कॉफी घेतल्यास ऍनिमिया, डोकेदुखी, भूक न लागणे, हातपाय थंड पडणे यासारख्या समस्या निर्माण होतात.

– डॉ. भारत लुणावत

Advertisements

Related Stories

‘हेपेटाइटिस-ए’ पासून बचावासाठी…

Omkar B

प्रीमॅच्युअर बेबींमधील आजार

Omkar B

बाळानंमधील फूड एलर्जी

Amit Kulkarni

चहा आणि कोरोना

Omkar B

भ्रूणाच्या नाळेत ‘मायक्रोप्लास्टिक’

Omkar B

डायव्हर्टिक्युलायटिस आणि पथ्याहार

Omkar B
error: Content is protected !!