तरुण भारत

टीम इंडियामधील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण

ऑनलाईन टीम / लंडन : 


इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघावर कोरोनाचे संकट आले आहे. इंग्लंडमध्ये असणाऱ्या भारतीय संघाच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील एका खेळाडूला सध्या त्याच्या नातेवाईकाच्या घरी क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

Advertisements

टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल झाल्यानंतर भारतीय खेळाडू सुट्टीवर होते. या खेळाडूचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तेव्हा अनेक खेळाडू गर्दीच्या ठिकाणी मास्क न घालता फिरत असल्याने अनेकांनी टीका केली होती. आता हाती आलेल्या माहितीनुसार भारतीय संघातील दोघा क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाली आहे. या दोन्ही खेळाडूंची प्रकृती चांगली आहे. त्यातील एका खेळाडूची टेस्ट नेगेटिव्ह आली आहे. तर दुसरा खेळाडू अद्याप आयसोलेशनमध्ये आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही खेळाडूंमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. जेव्हा त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली तेव्हा त्यांना खोकला आणि सर्दी ही लक्षणे दिसत होती. काळजी करण्यासारखे परिस्थिती नाही. एका खेळाडूची टेस्ट नेगेटिव्ह आली आहे. तर दुसऱ्या खेळाडूची टेस्ट रविवारी होणार आहे. संबंधित खेळाडू सध्या आयसोलेशनमध्ये असून त्याला कोरोनाची कोणतही लक्षणे नाहीत. आम्हाला आशा आहे की त्याची रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यानंतर तो पुन्हा कॅम्पमध्ये सहभागी होईल. 

दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी पत्र लिहून खेळाडूंना गर्दीच्या ठिकाणी जाण्यास टाळावे असा सल्ला दिला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहा यांनी भारतीय खेळाडूंना विम्बल्डन आणि युरो कपमधील सामन्यांपासून दूर राहण्यास सांगितले होते.

संघातील खेळाडूंना भारतातून इंग्लंडचा जाण्याआधी कोव्हिडशिल्ड ही लस देण्यात आली आहे. आता इंग्लंडमध्ये त्याचा दुसरा डोस दिला जाणार आहे. भारतीय खेळाडू 20 ते 22 जुलै या काळात काउंटी क्रिकेट संघासोबत तीन दिवसांचा सराव सामना खेळणार आहे.

Related Stories

भारताची डेव्हिस चषक लढत लांबणीवर

Patil_p

टी-20 नेतृत्वाचा ‘विराट’ राजीनामा

Amit Kulkarni

गर्ग, जयस्वाल, जुरेल यांची शानदार अर्धशतके

Patil_p

भारतात मागील 24 तासात 14,821 नवे कोरोना रुग्ण, 445 मृत्यू

datta jadhav

2032 चे ऑलिम्पिक यजमानपद ब्रिस्बेनला मिळणार?

Patil_p

कौंटी सिलेक्टविरुद्ध भारताचा सराव सामना आजपासून

Patil_p
error: Content is protected !!