तरुण भारत

बहुमत आहे तर घाबरता का? विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन फडणवीसांचं ठाकरे सरकारला आव्हान

मुंबई/प्रतिनिधी

काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे आपल्या हाती घेतली. तेव्हा पासून अध्यक्ष निवड न झाल्याने विधानसभा अध्यक्षांची खुर्ची खालीच आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन ठाकरे सरकारला देवेंद्र फडणवीस यांनी चॅलेंज केलं आहे. “विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी नियम बदलावे लागणार आहेत, ही बैठक अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली व्हावी लागते. पण अध्यक्षच नाहीत. तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, मग घाबरताय का?” असा सवाल विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.

तसेच फडणवीस यांनी “हात वर करुन का? घ्या मतदान, पाहूया ताकद. महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या काळात हे कधीही घडलं नव्हतं. यांचा ना एकमेकांवर विश्वास आहे, ना आमदारांवर” अशी टीकाही फडणवीसांनी केली. दरम्यान, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा केली. त्यानंतर फडणवीस बोलत होते.

विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी नियम बदलावे लागणार आहेत, ही बैठक अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली व्हावी लागते. पण अध्यक्षच नाहीत. तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, मग घाबरताय का? हात वर करुन का? घ्या मतदान, पाहूया ताकद. महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या काळात हे कधीही घडलं नव्हतं. यांचा ना एकमेकांवर विश्वास आहे, ना आमदारांवर, अशी टीकाही फडणवीसांनी केली.

Advertisements

Related Stories

महाराष्ट्र : 159 पोलिसांना कोरोनाची बाधा; एकूण आकडा 21,311 वर

Rohan_P

प्रांत कार्यालयात होणार दुमजली वाहनतळ

Patil_p

”अफगाणिस्तान दहशतीमागे दोन भारतीयांचा हात ?”

triratna

अखेर सेतू, महा ई सेवा केंद्र सुरू

triratna

धक्कादायक ! नाशिकमध्ये दोन बहिणींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Rohan_P

भारत चीन तणाव वाढलेला असताना भारताचे लष्करप्रमुख लडाखमध्ये

Rohan_P
error: Content is protected !!