तरुण भारत

18 वर्षावरील वयोगटासाठी लसीकरण सत्र

सावंतवाडी / वार्ताहर:

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 18 वर्षावरील वयोगटातील नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीच्या पहिला व दुसऱ्या डोससाठीचे लसीकरण सत्र शुक्रवार दि. 16 जुलै 2021 रोजी आयोजित करण्यात आले आहे. यावेळी ऑनलाईन तसेच ऑफलाईन नोंदणीची सोय देखील उपलब्ध आहे. तरी 18 वर्षावरील नागरिकांनी लसीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित रहावे व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
या लसीकरण सत्रादरम्यान उपलब्ध लसींची माहिती पुढीलप्रमाणे आहे. वैभववाडी तालुक्यात वैभववाडी – 260, उंबर्डे – 200. कणकवली तालुक्यात खारेपाटण – 200, कासार्डे – 200, कनेडी – 200, फोंडा – 200, कळसुली – 200, वरवडे – 200, नांदगाव – 200, उपजिल्हा रुग्णालय कणकवली – 260. देवगड तालुक्यात पडेल 200, मोंड – 200, फणसगाव – 200, मिठबांव – 200, इळिये – 200, शिरगाव -200, ग्रामीण रुग्णालय देवगड – 260. मालवण तावुक्यात आचरा – 200, मसुरे – 200, चौके – 200, गोळवण – 200, हिवाळे – 200, पेंडूर कट्टा ग्रामीण रुग्णालय 100, मालवण ग्रामीण रुग्णालय 260. कुडाळ तालुक्यात कडावल – 200, कसाल – 200, पणदूर – 200,हिर्लोक – 200, माणगाव – 200, वालावल – 200, कुडाळ ग्रामीण रुग्णालय 260, जिल्हा सामान्य रुग्णालय – 260. वेंगुर्ला तालुक्यात परुळा – 200, अडेली – 200, तुळस – 200, रेडी – 200, वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय – 250, उपजिल्हा रुग्णालय शिरोडा – 100, सावंतवाडी तालुक्यात मळेवाड – 200, सांगेली – 200, निरवडे – 200, आंबोली – 200, बांदा – 200, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी – 260. दोडामार्ग तालुक्यात भेडशी – 200, मोरगाव – 200, तळकट – 200, ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग – 260 अशा एकूण 9 हजार 930 लसीचे डोस उपलब्ध असणार आहेत.

Advertisements

Related Stories

शेतकऱयांचा कल आता हंगामी शेतीकडे

Abhijeet Shinde

उद्यापर्यंत गडगडाटासह पाऊस

NIKHIL_N

निर्भिड व्यापारी महासंघ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

Patil_p

जिल्हय़ातील 103 संशयितांचे अहवाल अद्यापही प्रतीक्षेत

Patil_p

भारतीय मजदूर संघाच्या मोर्चाला यश

Ganeshprasad Gogate

राजाचा आदेश प्रमाण, शिस्तीचे सर्वांना भान

NIKHIL_N
error: Content is protected !!