तरुण भारत

‘अल्काझार’ने एमजी हेक्टरला टाकले मागे

मुंबई : हय़ुंडाईच्या नव्या अल्काझारने कार विक्रीत जूनमध्ये एमजी हेक्टर व हेक्टर प्लस यांना मागे टाकले असल्याचे दिसून आले आहे. हय़ुंडाईने मागच्या महिन्यात 3 हजार 103 अल्काझार कार्सची विक्री केली होती तर यातुलनेत एमजीने 3002 कार्सची विक्री केली आहे. हय़ुंडाईची नवी अल्काझार ही कार मागच्या महिन्यात लाँच करण्यात आली असून 4000 वाहनांची विक्री आजवर करण्यात आली आहे. सातजण बसतील अशा गटात अल्काझार ही कार आधुनिक वैशिष्टय़ांसह लोकप्रिय होताना दिसते आहे. सीयाम म्हणजेच सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स यांनी अल्काझारच्या कार विक्रीसंबंधीची माहिती दिली आहे.  हेक्टर आणि हेक्टर प्लस यांचा विचार केल्यास हेक्टरला ग्राहकांची अधिकची पसंती मिळताना दिसते आहे. अल्काझारच्या तुलनेत मारूती सुझुकीची एक्सएल 6 या कार्सची विक्री जूनमध्ये 3 हजार 978 इतक्या संख्येची झाली आहे.

Related Stories

टीव्हीएसची इटीजीसोबत भागीदारी

Amit Kulkarni

एमजी मोटारने विकल्या 710 कार्स

Patil_p

मारुतीच्या कार्स तिसऱयांदा महागल्या

Patil_p

हय़ुंडाईच्या कार विक्रीत 3 टक्के वाढ

Patil_p

जग्वार लँड रोव्हरच्या विक्रीत 12 टक्के वाढ

Patil_p

आर्सेलर मित्तल 2 हजार कोटी गुंतवणार

Patil_p
error: Content is protected !!