तरुण भारत

रशियाच्या दोन जलतरणपटूंवर कारवाई

मॉस्को : 23 जुलैपासून सुरू होणाऱया टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या रशियाच्या दोन जलतरणपटूंवर आंतरराष्ट्रीय जलतरण संघटनेतर्फे (फिना) प्राथमिक स्वरूपाची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. रशियाच्या या दोन जलतरणपटूंनी उत्तेजक चाचणी नियमांचा भंग केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

ऑलिम्पिकमध्ये दाखल होण्यासाठी रशियाच्या कुडाशेव्ह आणि अँड्रय़ूसेंको या जलतरणपटूंची उत्तेजक चाचणी घेण्यात आली. त्यांच्या मुत्रल नमुन्यामध्ये निर्बंध घातलेले द्रव्य आढळल्याने त्यांच्यावर हंगामी स्वरूपाची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. टोकियो ऑलिम्पिक  उत्तेजक विरहित आणि पारदर्शक होण्यासाठी वाडाचे आतापासूनच सर्व प्रयत्न चालू आहेत. रशियावर आंतरराष्ट्रीय संघटनेकडून डोपिंगची कारवाई झाली असल्याने त्यांचे पथक टोकियो ऑलिम्पिकमध्ये ध्वज आणि राष्ट्रगीताविना सहभागी होणार आहे.

Advertisements

Related Stories

अहो आश्चर्यम्! नेटिझन्स चुकले! ‘ती’ महिला नव्हेच!

Patil_p

इटलीतील तीन शहरामध्ये डेव्हिस चषक स्पर्धेतील लढती

Patil_p

अमेरिकेची केनिन उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

लिव्हरपूलच्या विजयात सलाची हॅट्ट्रीक

Patil_p

मदतनिधी गोल्फ सामन्यात कपिलदेव, भुल्लरचा सहभाग

Patil_p

अर्लीन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

Patil_p
error: Content is protected !!