तरुण भारत

कोल्हापूर : तीन आठवड्यानंतर `गो कोरोना’..!

जिल्ह्यातील कोरोनामध्ये घट होणार : केंद्रीय पथकाला जिल्हा प्रशासनाची ग्वाही, सीपीआरमध्ये एचएमआयएस प्रणालीची सुचना,
कोरोनासाठी `आयएल सिक्स’ प्रणालीचे निर्देश, `ट्रिटमेंट प्रोटोकॉल’वर केंद्रीय समिती समाधानी

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

जिल्ह्यातील कोरोना मृत्यू, रूग्णसंख्येत घट होत आहे. यातून कोरोनाचा आलेख  हळूहळू कमी होत आहे. ट्रिटमेंट प्रोटोकॉल योग्यरितीने राबवला जात आहे. त्यामुळे तीन आठवड्यात जिल्ह्यातील कोरोना निश्चितच निचांकी येईल, असा विश्वास  जिल्हा प्रशासनाने केंदीय पथकासमोर व्यक्त केला. आरोग्य विभागाच्या चांगल्या उपाययोजनांवर समाधान व्यक्त केले. तसेच पथकाने सीपीआरमध्ये एचएमआयएस, आयएलसिक्स यंत्रणा आवश्यक असल्याचे नमूद पेले.

राज्यातील कोल्हापूरसह 7 जिल्ह्यात कोरोना साथ अद्यापी नियंत्रणात आलेली नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना मृत्यू, नव्या रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. राज्यात ती सर्वाधिक असल्याने त्याचीही दखल केंद्रीय आरोग्य विभागाने घेतली आहे. गुरूवारी कुटुंबकल्याण पुणे प्रादेशिक विभागाचे उपसंचालक डॉ. प्रणीत कांबळे, ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडीकल सायन्स (एम्स) चे फुफ्फुसरोग विभागाचे सहसंचालक डॉ. सत्यजित साहू यांचे केंद्रीय तपासणी पथक जिल्ह्यात दाखल झाले. या पथकासमवेत राज्य सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे होते.

केंद्रीय पथकाने गुरूवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा आढावा घेतला. नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पॉवरपाँईटद्वारे कोरोना स्थितीचे सादरीकरण केले. हे सादरीकरण दोन तास सुरू होते. कोरोना काळात राबवलेल्या उपाययोजना, उशिरा येणारे रूग्ण, जिल्ह्यात दीड महिना उशिरा आलेली लाट याची माहिती देण्यात आली. चार तास ही मॅरथॉन बैठक सुरू होती.

केंद्रीय पथकाच्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे, जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, मनपा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त निखील मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषा कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे. डॉ. अनीता सैबन्नावर, डॉ. संतोष तावशी, डॉ. पावरा आदी उपस्थित होते.

केंद्रीय पथकाने दुपारी सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमधील लसीकरण केंद्राला भेट दिली. सायंकाळी सीपीआर हॉस्पिटलला भेट दिली. तेथे या पथकाने दीड तास कोरोना उपचाराची माहिती घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय बर्गे, डॉ. अनीता सैबन्नावर, डॉ. संगीता कुंभोजकर, डॉ. अनीता परीतेकर, डॉ. उल्हास मिसाळ आदी उपस्थित होते. बैठकीनंतर केंदीय पथकाने दिवसभरात मांडलेल्या मुद्यांची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मेरे यांनी पत्रकारांना दिली.

डॉ. मोरे म्हणाले, राज्यात कोरोनाची साथ हळूहळू वाढत गेली, ती उच्चांकी पोहोचल्यानंतर अन्य जिल्ह्यात ती कमी झाली आहे. राज्यातील कोल्हापूरसह सात जिल्ह्यात कोरोनाची साथ अद्यापी कायम आहे. त्यामुळे केंद्रातील दोन सदस्यीय पथकाने कोल्हापूरला भेट दिली. या पथकात कुटुंबकल्याण पुणे प्रादेशिक विभागाचे उपसंचालक डॉ. प्रणीत कांबळे, ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडीकल सायन्स (एम्स) चे फुफ्फुसरोग विभागाचे सहसंचालक डॉ. सत्यजित साहू यांचा समावेश आहे. पथकासमवेत राज्य सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे आहेत. कोल्हापुरात दोन महिने उशिरा ही साथ सुरू झाली, त्यामुळे जिल्ह्यात येत्या 3 आठवड्यात कोरोना निचांकी येईल, असा विश्वास प्रशासनाने पथकासमोर व्यक्त केला आहे. पथकाने ट्रिटमेंट प्रोटोकॉलवर समाधान व्यक्त केले.

हॉस्पिटलमधील रूग्णांचे डॉक्युपिटेशन करण्याची सुचना

पथकाने सीपीआर हॉस्पिटलमधील उपचार घेणाऱ्या रूग्णांचे डॉक्युपीटेशन करावे, पहिल्याच पानावर उपचारात होणाऱ्या चाचण्यांची नोंद करावी, लवकर निदानासाठी ग्रामीण भागातील आशा वर्कर्स, ग्रामसेवकांनी संशयित रूग्ण तातडीने हॉस्पिटलला पाठवावेत, असेही निर्देश दिले. कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने वाढवलेल्या टेस्टींगचे पथकाने कौतुक केले.

`एचएमआयएस’साठी आजच प्रस्ताव देणार : अधिष्ठाता डॉ. मोरे

सीपीआर हॉस्पिटलमध्ये कोरोना रूग्णांवर ट्रिटमेंट प्रोटोकॉलनुसार उपचार होत आहेत, याबद्दल पथकाने समाधान व्यक्त केले. सीपीआरमध्ये `एचएमआयएस’ हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टीम उभारावी, तसेच कोरोना निदानासाठी आय एल सिक्स (इंटरल्युकीन 6) सिस्टीम उभारण्याची सुचना समितीने केली. एचएमआयएससाठी सीपीआर प्रशासनच उद्याच प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाला सादर करणार आहे. त्यासाठी 4 कोटीचा खर्च अपेक्षित असल्याचे अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी स्पष्ट केले.

Related Stories

कोल्हापूर : महे-कसबा बीड पुलाजवळील अपघातात युवक जागीच ठार

Abhijeet Shinde

महाराष्ट्र केसरी स्पर्धेला शासनाच्या ग्रीन सिग्नलची प्रतिक्षा

Abhijeet Shinde

मराठा आरक्षणावर घटनापीठ देणार फैसला

Abhijeet Shinde

शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार प्रदान

Abhijeet Shinde

कावळा.. त्याने लावला माणसाला लळा..

Abhijeet Shinde

सात वर्षांपूर्वीच्या मंजूर योजना अद्याप प्रलंबित का ?

Abhijeet Shinde
error: Content is protected !!