तरुण भारत

सांगली : विकासकामे करताना कोणत्या गावात किती मते मिळाली याचा विचार करत नाही

आमदार अनिल बाबर यांचा विरोधकांना टोला

प्रतिनिधी / विटा

Advertisements

मी निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार होतो. मात्र निवडणूक संपल्यानंतर जनतेचा आमदार आहे. निवडणुकीत कधी मतांचा हिशोब केला नाही. त्यामुळे कोणत्या गावात किती मते मिळाली याचा विचार न करता विकासकामे करत असतो, असा टोला लगावत सर्वानी एकत्रित काम केल्यास शहराचा सर्वांगीण विकास शक्य आहे, असे मत आमदार अनिल बाबर यांनी व्यक्त केले.

विटा शहरातील मायणी रोड ते नेवरी रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आ. अनिल बाबर यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी नगरसेवक अमोल बाबर, जिल्हा परिषद सदस्य सुहास बाबर, नगरसेवक अमर शितोळे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब लाकडे, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, शहर भाजपचे अध्यक्ष अनिल म. बाबर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश पाटील, विटा बँकेचे चेअरमन विनोद गुळवणी, माजी सभापती विनय भंडारे, उत्तम चोथे आदी उपस्थित होते.

Related Stories

अटल बिहारी वाजपेयी यांना सांगलीत आदरांजली

triratna

सांगली : श्रीराम मंदिर भूमीपूजन सोहळ्यानिमित्त आमदारांनी साजरा केला आनंदोत्सव

triratna

सांगली जिल्ह्यात नवे 288 तर 492 कोरोनामुक्त

triratna

सांगली : करगणी ग्रामपंचायतीकडून प्राथमिक आरोग्य केंद्राला 4 ऑक्सिजन मशीन, आरोग्य साधने प्रदान

triratna

सांगली : देशव्यापी संपात जिल्ह्यातील ३५ हजार

triratna

सांगली : बागणी प्राथमिक आरोग्य केंद्रातच सोशल डिस्टन्सचा फज्जा

triratna
error: Content is protected !!