तरुण भारत

सत्ताधाऱ्यांकडून फेरीवाल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार

सातारा / प्रतिनिधी : 

जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे ज्यांचे हातावर पोट आहे, अशा लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे सातारा शहरातील फेरीवाल्यांना अनुदान देण्याची घोषणा सत्ताधाऱ्यांनी जाहीरपणे केली खरी परंतु, अद्यापही कोणत्याही फेरीवाल्याला अनुदान देऊ केलेले नाही. ही बाब अतिशय लज्जास्पद असून, फेरीवाल्यांच्या दुःखावर मीठ चोळण्याचा प्रयत्न सुरू आहे. दहा दिवसात हे अनुदान न दिल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल, असा इशारा नगरसेवक अविनाश कदम यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

Advertisements

कदम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीचे सावट सर्वत्र आहे. त्यामुळे हातावरचे पोट असणाऱ्यांचे जीवनमान अतिशय गंभीर झालेले आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 नुसार व नियम 247 मध्ये नमुद दुर्धर रोगांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे ज्यांची मोठय़ा प्रमाणावर हानी झाली आहे. त्या व्यक्तीस पालिकेने मान्यता दिली असेल तर भरपाई देता येईल, अशी तरतूद असताना सुद्धा सहा महिन्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी फेरीवाल्यांसाठी 1500 रुपये अुनदान जाहीर केले. परंतु, अद्याप कुठल्याही फेरीवाल्यांना अनुदान दिले गेले नसल्याचे दिसून आले. ही बाब  लज्जास्पद असून, फेरीवाल्यांच्या दुःखावर मीठ चोळण्याचा प्रयत्न करत आहे. दहा दिवसात हे अनुदान न दिल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल, असेही कदम यांनी म्हटले आहे.

Related Stories

काही चांगलं पण घडतंय…

datta jadhav

कुडाळमधील मृत कोंबडय़ांचा बर्ड फ्लू अहवाल नेगिटिव्ह

Patil_p

ट्रक खरेदी व्यवहारात फसवणूक

Patil_p

सातारा : ‘छत्रपतींचे सेवक ग्रुप’कडून किल्ले अजिंक्यताऱ्याच्या राज महालाची स्वच्छता

Abhijeet Shinde

सातारा जिल्ह्यातून आज 69 जणांना डिस्चार्ज, कोरोनाचे 5 बळी

Abhijeet Shinde

सातारा : प्रतापसिंह शेती फार्ममधील उसाला लावली आग

datta jadhav
error: Content is protected !!