तरुण भारत

सांगली जिल्हा सीएचओ फोरम अध्यक्षपदी डॉ. विक्रमादित्य देशमुख

फोरमला निमा संघटनेचे पाठबळ – डॉ. अभिजित निकम

प्रतिनिधी / विटा

Advertisements

निमा संघटनेच्या अंतर्गत सांगली जिल्हा सीएचओ फोरम स्थापन करण्यात आला. विट्यात निमा संघटना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संघटनेच्या पदाधिकारी निवडी झाल्या. जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. विक्रमादित्य देशमुख यांची निवड झाली. यावेळी फोरमला पाठबळ देण्याची खात्री निमाचे सचिव डॉ. अभिजित निकम यांनी दिली.

निमा अंतर्गत सिएओ फोरममध्ये जिल्ह्यातील प्रतिनिधी घेण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा अध्यक्ष म्हणून डॉ. विक्रमादित्य देशमुख यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष डॉ. विश्वास जाधव, सचिव डॉ. ऋतुजा विभुते, सहसचिव डॉ. समीर सनदी, खजिनदार डॉ. मोहम्मद मुल्ला यांची निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

यावेळी विटा निमाचे अध्यक्ष डॉ. दत्ताजीराव हुलगे उपाध्यक्ष, डॉ. महेश माळी, सेक्रेटरी डॉ. अभिजीत निकम, खजिनदार डॉ. वर्षाराणी लावंड तसेच मिरज निमाचे सेक्रेटरी डॉ. स्वप्निल नाडे हे उपस्थित होते. येणाऱ्या काळामध्ये सी. एच. ओ. यांच्या भल्यासाठी संघटना काम करेल, याची ग्वाही नूतन अध्यक्ष डॉ. विक्रमादित्य देशमुख यांनी दिली. समुदाय आरोग्य अधिकारी हे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत. त्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी निमा संघटना कायम पाठीशी राहील. त्यांना लागणारा आधार आणि कायदेशीर पाठबळ निमा संघटना देत राहील, याची ग्वाही डॉ स्वप्नील नाडे व डॉ. अभिजीत निकम यांनी दिली.

यावेळी निमा राज्य कार्यकारणी सदस्य डॉ. बाजीराव जाधव, डॉ. अमोल हुलवान, विटा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. कुंभार, डॉ. दीपक कुलकर्णी, डॉ.अरविंद तारळेकर, डॉ. सुधाकर कुंभार, डॉ मुरलीधर जाधव, डॉ. राजेंद्र लावंड, डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. प्रदीप लवटे, डॉ. प्रमोद महाडिक, डॉ. ऋषिकेश मेटकरी, डॉ बालाजी कदम यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

Related Stories

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर, नवे 186 रूग्ण

Abhijeet Shinde

सांगली : पलूस तालुक्यात पूरबाधितांचे पंचनामे अंतिम टप्यात

Abhijeet Shinde

इस्लामपूर आगारात शिवसेना व रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांच्यात दगडफेक

Abhijeet Shinde

समडोळी येथे कोविड सेंटरमधून ९० वर्षांच्या आजीसह २० जण कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

बेरोजगार अभियंत्यांनी बंद पाडली बांधकाम विभागाची मिटींग

Abhijeet Shinde

पहा कृष्णेच सौंदर्य …… एक नयनरम्य दृश्य !

Abhijeet Shinde
error: Content is protected !!