तरुण भारत

कोरोना झाल्याने मिनॉर ऑलिम्पिकमधून बाहेर

वृत्तसंस्था/ सिडनी

ऑस्ट्रेलियाचा पुरुष टेनिसपटू ऍलेक्स डी मिनॉर याला कोरोनाची बाधा झाल्याने तो टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही, अशी माहिती ऑस्ट्रेलियाच्या ऑलिम्पिक पथक प्रमुखांनी दिली आहे.

Advertisements

ऑस्ट्रेलियन टेनिसपटू मिनॉरचे गेल्या आठवडय़ात स्पेनमध्ये वास्तव्य होते. ऑलिम्पिक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व करण्याचे स्वप्न मिनॉरने बाळगले होते. टोकियो ऑलिम्पिकसाठी त्याची निवडही झाली होती. तो ऑलिम्पिक स्पर्धेत एकेरी आणि दुहेरी या प्रकारात खेळणार होता. दरम्यान मिनॉरची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यापूर्वी त्याने विम्बल्डन स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला होता. विम्बल्डन स्पर्धेनंतर कोरोना चाचणीत तो निगेटिव्ह असल्याचे आढळून आले होते. आता टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाच्या चमूमध्ये पाच पुरुष आणि पाच महिला टेनिसपटूंचा समावेश राहिल. टॉप सिडेड ऍश्ले बार्टी तसेच माजी अमेरिकन ग्रँडस्लॅम विजेती समंथा स्टोसूर, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. स्टोसूरची ही पाचवी ऑलिम्पिक स्पर्धा आहे.

Related Stories

रवि दहिया आज सुवर्णपदकासाठी लढणार!

Patil_p

हॉलंडचा आयर्लंडवर रोमांचक विजय

Amit Kulkarni

श्रीलंकेत भारतीय क्रिकेट संघाच्या सरावाला प्रारंभ

Patil_p

पाकिस्तानचा सलग दुसरा विजय

Patil_p

अतुल बेदाडे यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी

Patil_p

स्मृती मानधनाची वनडे मानांकनात घसरण

Patil_p
error: Content is protected !!