तरुण भारत

पाठय़पुस्तकाचे मंगळवारपासून होणार वितरण

प्रतिनिधी/ सातारा

 सध्या शाळा महाविद्यालये जरी बंद असली तरी शिक्षण विभागातर्फे ऑनलाईनच्या माध्यमातुन मार्गदर्शन सुरू आहे. पण मागील काही दिवसांपासून पाठय़ पुस्तके उपलब्ध न झाल्यामुळे संबंधीत विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याकरीता अडचणी निर्माण होत होत्या. पण आता जिल्हा परिषदे अंतर्गत शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना येत्या काही दिवसातच पाठय़ पुस्तके ही उपलब्ध होणार आहेत.

Advertisements

 तालुका स्तरअंतर्गत ठेकेदारांमार्फत ही पाठय़पुस्तके शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. येत्या मंगळवार पर्यंत जिल्हय़ातील सर्वच तालुक्यांमध्ये ही पाठय़पुस्तके उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आडेवारी नुसार काही पुस्तके ही कमी प्रमाणात येणार असुन पुर्णवापरातील पुस्तके ही वापरण्यात येणार आहेत.

 यंदा एकुण जिल्हय़ात सर्व विषयांची मिळुन 14 लाख 3 हजार 90 पाठय़पुस्तके उपलब्ध होणार आहेत. मागील वर्षी ही कोरोनामुळे काही पाठय़पुस्तकांचा संच हा विद्यार्थ्यांना न वापरल्यामुळे तो शाळेतच आहे. त्यामुळे यंदा पाठय़पुस्तके जरी कमी असली तरी पुर्णवापरातील पुस्तके उपलब्ध असल्याने सर्वच विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध होणार आहेत.

Related Stories

बार्शीतील 14 जण सोलापूरला हलवले, आता लक्ष रिपोर्टवर

Abhijeet Shinde

न्यायालयात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक; महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षास अटक

Abhijeet Shinde

रयत संस्था उभारणार 38 मदत केंद्रे

Patil_p

सातारा : जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 34.01 टक्क्यांवर

datta jadhav

पालिकेचा आरोग्य विभाग डाराडुर

Patil_p

गोवा पर्यटन विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा ‘मराठा आक्रमक’ असा उल्लेख

Abhijeet Shinde
error: Content is protected !!