तरुण भारत

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कुटुंबाला शिवसेनेचा मदतीचा हात

प्रतिनिधी /बेळगाव

लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबे दुसऱया गावामध्ये अडकली होती. अशाच एका कुटुंबाला बेळगाव सीमाभाग शिवसेनेच्यावतीने मदतीचा हात देण्यात आला. मूळचे महाराष्ट्रातील गरीब कुटुंब समारंभासाठी कर्नाटकात आले असता लॉकडाऊनमुळे ते तेथेच अडकले. घरची हलाखीची परिस्थिती असल्याने स्वतंत्र गाडी करून जाणेही शक्मय नव्हते. त्यामुळे 3 महिन्यांनंतर शिवसेनेच्या मदतीने हे कुटुंब आपल्या गावी परतले आहे.

Advertisements

सुंडी (ता. चंदगड) येथील मारुती सुतार हे एका समारंभासाठी कुटुंबासमवेत हत्तरगीनजीकच्या बिरनोळी गावात गेले होते. परंतु लॉकडाऊनमुळे हे कुटुंब तेथेच अडकले. खासगी गाडी करून गावी परतण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसल्याने तेथेच मिळेल ते काम करत काही दिवस काढले. परंतु दिवसेंदिवस हलाखीची परिस्थिती होत असल्याने कुटुंब अडचणीत सापडले.

याची माहिती मिळताच शिवसेनेचे पदाधिकारी बिरनोळी येथे पोहोचले. तेथून त्या कुटुंबाला घेऊन सुंडी या गावी त्यांना पोहोचविण्यात आले. तसेच पुढील दोन महिने पुरेल इतके अन्नधान्य व घर खर्चासाठी 3 हजार रुपये कुटुंबाला देण्यात आले. शिवसेनेने केलेल्या मदतीमुळे सुतार कुटुंबाने आभार मानले. जिल्हा उपप्रमुख बंडू केरवाडकर, शहर उपप्रमुख राजू तुडयेकर, प्रवीण तेजम यांनी या कार्यासाठी पुढाकार घेतला.

Related Stories

स्मार्टसिटी अधिकाऱयाच्या घरात 23 लाखाचे घबाड

Omkar B

मनोहर बाळाराम मुंगारी यांचे निधन

Patil_p

अनलॉकनंतर बँकांच्या गर्दीत वाढ

Amit Kulkarni

कॅम्प येथे गुलमोहर उन्मळून पडला

Patil_p

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन मुले जखमी

Patil_p

बेंगळूर हिंसाचारात एसडीपीआयचा सहभाग : मंत्री आर. अशोक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!