तरुण भारत

इंधन दरवाढीचा भडका; मध्य प्रदेशात पेट्रोल 112 रुपये लिटर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


पेट्रोलियम कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरात वाढ केली आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ केलेली नाही. त्यानुसार, आज पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर 29 ते 30 पैशांनी वाढ झाली. त्यातच मध्य प्रदेशाने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले असून एक लिटर पेट्रोलसाठी 112 रुपये मोजावे लागत आहेत. देशात सर्वाधिक किंमत मध्य प्रदेशात आहे.

Advertisements


दिल्ली, कोलकाता आणि आता चेन्नईमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. तर मुंबई, पुण्यात मागील काही दिवसांपासून पेट्रोलची किंमत 100 पार गेली आहे. 


मुंबईत आज पेट्रोल प्रति लिटर 107.83 रुपये तर डिझेल 97.45 रुपये इतके झाले आहे. तर दिल्लीत पेट्रोल 101.84 रुपये तर डिझेल 89.87 रुपये इतके झाले आहे. चेन्नई पेट्रोल 102.49 रुपये तर डिझेल 94.39 इतके आहे. आणि कोलकातामध्ये पेट्रोल 102.08 रुपये तर डिझेल 93.02 रुपये इतके वाढले आहे.

  • दररोज 6 वाजता किंमती बदलतात


दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

Related Stories

अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घट

prashant_c

16 वर्षांनी सापडला सैनिकाचा मृतदेह

Patil_p

नागरिकत्व कायदा विरोधक दलितविरोधी

Patil_p

बंगाल निवडणुकीदरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त कोरोनाबाधित

datta jadhav

दिलासादायक : उत्तराखंडात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 50 हजाराच्या उंबरठ्यावर

Rohan_P

सातारा : वाठार स्टेशनमध्ये अवतरलं काश्मीर

datta jadhav
error: Content is protected !!