तरुण भारत

अमेरिकेकडून ‘एमएच-60 आर’ हेलिकॉप्टर्स भारतीय नौदलाकडे सुपूर्द

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


अमेरिकन नौदलाने ‘एमएच-60 आर’ ही बहुभूमिका असलेली दोन हेलिकॉप्टर्स भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली आहेत. अमेरिकन सरकारकडून परदेशी लष्करी विक्रीअंतर्गतL लॉकहीड मार्टिनने तयार केलेली ही 24 हेलिकॉप्टर्स भारतीय नौदल विकत घेत असून, त्याची किंमत अंदाजे 2.4 अब्ज डॉलर्स आहे.

Advertisements

सॅन डिएगोच्या नौदलाच्या एनएएस नॉर्थ आयलंड येथे शुक्रवारी झालेल्या समारंभात अमेरिकन नौदलाकडून ही हेलिकॉप्टर्स औपचारिकपणे भारतीय नौदलाकडे देण्यात आली. या कार्यक्रमाला अमेरिकेचे भारताचे राजदूत रणजितसिंग संधू उपस्थित होते. 
राजदूत संधू म्हणाले की, बहुभूमिका असलेली हेलिकॉप्टर्स ताफ्यात समाविष्ट करणे हे भारत-अमेरिका द्विपक्षीय संरक्षण संबंधातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “भारत-अमेरिका मैत्री नवीन उंची गाठत आहे.”

Related Stories

भारतीय लस दृष्टिपथात!

Patil_p

उत्तराखंड महाप्रलय : 26 मृतदेह हाती, अजूनही 171 जण बेपत्ता

datta jadhav

ऑलिम्पिकमधील यशातून प्रेरणा घ्या!

Patil_p

एसटी संपामुळे भक्तांना विठुदर्शनाचा ‘दुरावा’

Patil_p

‘जेडीयू’तील ‘या’ बड्या नेत्याला फोडून तेजस्वी यादवांचा नितीशकुमारांना दे धक्का

Abhijeet Shinde

राफेलचा हवाई दलात समावेश

Rohan_P
error: Content is protected !!