तरुण भारत

राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवं असलेलं नेतृत्व: चंद्रकांत पाटील

मुंबई/प्रतिनिधी


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही नाशिक दौऱ्यावर असून ते कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. त्यामुळे भाजप – मनसे युती होणार असल्याच्या चर्चा सुरु असताना चंद्रकांत पाटील यांनी जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना परप्रांतीयांबद्दलचे आपले धोरण बदलत नाही, तोपर्यंत आमची त्यांच्याशी युती होणे शक्य नाही. तसेच राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवे असेलेले नेते आहेत, परंतु महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणू शकत नाहीत. असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.

दरम्यान नाशिक महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील नाशिकमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. दरम्यान, राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवं असलेलं नेतृत्व आहे. परंतु ते एकटे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू शकत नाही. मनसेने परप्रांतियांबाबतची भूमिका बदलल्याशिवाय त्यांच्यासोबत युती करणं अशक्य आहे. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

नाशिक महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या नाशिकमध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे. एकेकाळी नाशिक मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळख होती. नंतरच्या काळात कार्यकर्त्यांचे संघटन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. आता पुन्हा राज ठाकरे पक्षाला बळकटी देण्यासाठी ऍक्शन मोडमध्ये आले आहेत.

दरम्यान नाशिकमधील पालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजप – मनसेच्या युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. राज ठाकरेंविषयी केलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यांनंतर युतीच्या चर्चांना उधान आले आहे.

Advertisements

Related Stories

बाधित रुग्णाच्या कुटुबांची अवहेलना करत असल्याचा तक्रार अर्ज पोलिसात

Patil_p

कणकवली रुग्णालयासमोर दुचाकी गॅरेजला आग!

Ganeshprasad Gogate

`युनिफाईड बायलॉज’चे घोडे अडले कुठे?’

Abhijeet Shinde

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त उपक्रमांचे आयोजन

Rohan_P

कर्नाटक: द्वितीय पीयू परीक्षा पुढे ढकलली

Abhijeet Shinde

भाजप राज्य प्रभारींकडे ‘या’ आमदाराने केली मुख्यमंत्री बदलाची मागणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!