तरुण भारत

कुंडल येथे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रांताधिकाऱ्यांची कारवाई

वार्ताहर / कुंडल

कुंडल येथे दहा दिवसाच्या कडक लॉकडाऊन काळात प्रांताधिकारी गणेश मरकंड यांनी अचानक तपासणी करत प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी व्यापारी व पतसंस्थांवर दंडात्मक कारवाई केली.

Advertisements

कुंडलमध्ये गेली काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. यावर उपाय योजना म्हणून कुंडल गाव दहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीकडून घेण्यात आला. यावेळी मेडीकल, शेती औषधे दुकान व दुध डेअरी, दवाखाने यांना काही अटींवर परवानगी देण्यात आली होती परंतु आज अचानक प्रांताधिकारी गणेश मरकंड यांनी कुंडल येथे भेट दिली.

यावेळी त्यांनी मेडिकल, पतसंस्थामधील कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट नसल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन सर्व व्यापारी, मेडिकल, औषध दुकानदार, दुध डेअरी चालक यांनी दर पंधरा दिवसाला कोरोना टेस्ट कराव्यात अशी सुचना दिल्या आहेत. या नियमांचे जो कोणी उल्लंघन करेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे प्रांताधिकारी गणेश मरकंड यांनी सांगितले.
पंधरा दिवसाला कोरोना टेस्ट करावी हि सुचना प्रशासनाने दिली नसल्याचे व्यापार्यांनी सांगीतले व या कारणास्तव आर्थीक दंड केल्याने व्यापार्यांनी नाराजी व्यक्त केली.

यावेळी मामासाहेब पवार सत्यविजय बँकेचे चेअरमन बाळासाहेब पवार, सरपंच प्रमिलाताई पुजारी, उपसरंपच माणिक दादा पवार, सर्जेराव पवार यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते

Related Stories

मिरजेत महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचा जल्लोष

Abhijeet Shinde

पाण्याच्या टीतून निघाले सहा साप, शेतकऱ्याची भंबेरी

Abhijeet Shinde

ढवळीचे उपसरपंच अतुल पाटील यांचे हृदयविकाराने निधन

Abhijeet Shinde

तासगाव तालुक्यात कोरोना रुग्णांची हजारी पार

Abhijeet Shinde

मालगांव, सिध्देवाडीत पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन

Abhijeet Shinde

सांगली : मिरज-शेणोली रेल्वे मार्गावर धावले विद्युत इंजिन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!