तरुण भारत

‘कोविशिल्ड’, ‘कोवॅक्सिन’च्या 66 कोटी डोसची वाढीव दराने होणार खरेदी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

‘कोविशिल्ड’ आणि ‘कोवॅक्सिन’ या दोन्ही लसींच्या खरेदी किंमतीत वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या दोन्ही कंपन्या वारंवार दरवाढीची मागणी करत होत्या. त्यामुळे ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसींचे 66 कोटी डोस नवीन दराने खरेदी केले जातील. आतापर्यंत हे डोस 150 रुपये प्रति डोस दराने खरेदी केले जात होते. अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने एका संकेतस्थळाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

Advertisements

ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून कोविशिल्डचे 37.5 कोटी डोस आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनचे 28.5 कोटी डोस खरेदी केले जातील. हे 66 कोटी अधिक डोस अनुक्रमे 205 रुपये आणि 215 रुपये प्रति डोस दराने खरेदी केले जातील, त्यामध्ये कराचा समावेश नसेल. करांसह कोविशिल्डची किंमत प्रति डोस 215.25 रुपये आणि कोवॅक्सिनची किंमत प्रति डोस 225.75 रुपये असेल.

Related Stories

दिल्लीतील जलपुरवठा जागतिक दर्जाचा होणार

Patil_p

चौथ्या शनिवारी सुटी न घेणाऱया सरकारी कर्मचाऱयांना 15 दिवस प्रासंगिक रजा

Patil_p

ब्रिटनमधून अमली पदार्थांच्या तस्कराचे प्रत्यार्पण

Patil_p

धर्मनिरपेक्षतेचा अर्थ तुष्टीकरण नव्हे!

Patil_p

वय 10 दिवस, वजन 1.3 किलो, नवजात वाऱ्यावर

Patil_p

सर्वोच्च न्यायालयाच्या कृती दलाकडून केंद्राचे कौतुक

Amit Kulkarni
error: Content is protected !!