तरुण भारत

भारत-श्रीलंका यांच्यात आज पहिली वनडे

वृत्तसंस्था/कोलंबो

यजमान श्रीलंका आणि भारत यांच्यातील पहिल्या वनडे सामन्याला येथे रविवारी प्रारंभ होत आहे. धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघातील अनेक नवोदितांची आगामी विश्वचषक टी-20 स्पर्धेसाठी राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यासाठी चुरस पाहावयास मिळेल अशी अपेक्षा आहे. हा सामना रविवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल.

Advertisements

कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे तर धवनच्या नेतृत्वाखाली भारताच्या दुय्यम संघासाठी लंकेचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. चालूवर्षी होणाऱया आयसीसीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघातील काही रिकाम्या जागा भरणार असून अनेक नवोदितांच्या कामगिरीवर निवड समितीचे लक्ष राहील.

लंकेच्या दौऱयात तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळविले जाणार आहेत. दरम्यान कोरोनाचे सावट लंकन संघावर असल्याचे दिसून येते. लंकन संघाचे नेतृत्व दासून शेनकाकडे सोपविण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांच्या कालावधीत लंकन संघाला लाभलेला हा दहावा कर्णधार आहे. धनंजय डिसिल्वा हा या संघातील भरवंशाचा फलंदाज असून चमिरा हा आघाडीचा वेगवान गोलंदाज आहे. कुशल मेंडीस आणि डिक्वेला यांनी बायो बबल (जैविक सुरक्षा) नियमाचा भंग केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई लंकन क्रिकेट मंडळाने केली आहे.

माजी कर्णधार कुशल परेराला दुखापतची समस्या भेडसावत असल्याने तो या मालिकेत खेळू शकला नाही. भारतीय संघामध्ये आक्रमक आणि दर्जेदार फलंदाजांचा समावेश असून अचूक वेगवान गोलंदाजीसमोर लंकन संघाची सत्वपरीक्षा ठरणार आहे. इंग्लंडच्या दौऱयात लंकन संघाची कामगिरी निकृष्ट झाल्याने भारताविरूद्ध मालिकेत एक सामना जिंकला तरी पुष्कळ असल्याचे दिसून येईल.

या सामन्यात कर्णधार शिखर धवनसमवेत पृथ्वी शॉला सलामीला पाठविले जाईल. अलीकडेच झालेल्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत पृथ्वी शॉ ने सर्वाधिक धावा जमविल्या असून तो चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे जाणवते. अनुभवी अष्टपैलू हार्दिक पांडय़ा तसेच भुवनेश्वरकुमार यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली जाते.

भुवनेश्वरकुमारकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. तिसऱया क्रमांकाच्या फलंदाजांसाठी प्रामुख्याने देवदत्त पडीकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव आणि मनिष पांडे यांच्यात चुरस राहील. अंतिम अकरा खेळाडूंत स्थान मिळविण्यासाठी के. गौतम आणि कृणाल पांडे यांच्यात चढाओढ राहील. राहुल चहर आणि यजुवेंद्र चहल यापैकी एकाला संधी मिळेल. मुंबई संघातील इशान किसन हा खालच्या क्रमांकावर उपयुक्त फटकेबाजी करू शकतो. भारतीय संघाची फलंदाजी भक्कम असल्याचे जाणवते त्यामुळे अंतिम अकरा खेळाडूं स्थान मिळविण्याकरिता चुरस राहील. धवनच्या भारतीय संघाला माजी कर्णधार आणि राष्ट्रीय अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे. कोलंबोतील आगामी अकरा दिवसांच्या कालावधीत संघ व्यवस्थापनाला निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावे लागतील.

लंकन दौऱयासाठी निवडण्यात आलेल्या भारताच्या दुय्यम संघामध्ये शिखर धवन, पृथ्वी शॉ हे अव्वल असून त्यानंतर हार्दिक पांडय़ा, कृणाल पांडय़ा, सुर्यकुमार यादव, मनिष पांडे हे भरवंशाचे खेळाडूं म्हणून ओळखले जातात.अनुभवे भुवनेश्वरकुमार, दीपक चहर, यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्यावर भारतीय संघाच्या गोलंदाजीची भिस्त राहील. या भारतीय संघातील काही खेळाडू नियमितपणे टी-20 प्रकारात वारंवार खेळत असल्याने आगामी विश्वचषक टी-20 स्पर्धेसाठी लंकेचा दौरा भारतीय संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा राहणार असून याची चांगली जाणीव धवन आणि द्रविड यांना आहे.

अंतिम अकरा खेळाडूंची निवड करताना भारताचा कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक रवीशास्त्राr यांच्यात चर्चा केली जाते. त्याचप्रमाणे धवन आणि द्रविड यांच्यातही अंतिम संघ निवडीसाठी चर्चा निश्चित होईल. भारतीय संघामध्ये या दौऱयासाठी सहा नवोदितांचा समावेश करण्यात आला आहे. वरूण चक्रवर्ती आणि चेतन साकारिया हे भारतीय संघासमोर पर्याय आहेत.

चहल आणि कुलदीप यादव या फिरकी गोलंदाजांसाठी लंकेचा दौरा महत्त्वाचा आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये होणाऱया आगामी आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी  शिखर धवनची निवड निश्चित नसेल कारण रोहित शर्मा, विराट कोहली व के.एल राहुल यांच्यात सलामीच्या फलंदाजीसाठी चुरस आहे.

संभाव्य संघ

भारत- शिखर धवन, पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, नितीश राणा, इशान किसन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा, के. गौतम, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती, राहुल चहर, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), चेतन साकरिया, नवदीप सैनी.

लंका- डी. शनाका (कर्णधार), धनंजय डिसिल्वा (उपकर्णधार), अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, पी. निशांका, सी.सी.असालेंका, हसरंगा, बंदारा, भानुका, एल. उदारा, रमेश मेंडीस, चमिका करूणारत्ने,. डी. चमिरा, सँडेकेन, अकिला धनंजय, एस. फर्नांडो, धनंजय एल., इशान जयरत्ने, प्रवीण जयविक्रमा, असिता फर्नांडो, के. रजिता, एल.कुमारा आणि उदाना.

Related Stories

…तर आणखी उचित सांगता झाली असती!

Patil_p

न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियावर रोमांचक विजय

Amit Kulkarni

लंडन डायमंड लीग स्पर्धा रद्द

Patil_p

जोकोविच-नदालमध्ये अंतिम लढत

Patil_p

विंडीजचे माजी क्रिकेटपटू एव्हर्टन वीक्स कालवश

Patil_p

खुन्नस देण्यावरून युवकाचा खून

Patil_p
error: Content is protected !!