तरुण भारत

महिलेचे सहा तोळय़ांचे दागिने लंपास

भर बाजारात घडलेल्या घटनेने खळबळ, महिला सराफी दुकानाला जाताना भामटय़ांची कराम

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

हिरेबागेवाडी येथील एका महिलेच्या बॅगमधील सहा तोळय़ांचे दागिने असलेली पर्स अज्ञातांनी पळविली आहे. शनिवारी भर बाजारपेठेत घडलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली असून या संबंधी मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी आठवडी बाजारादिवशी बाजारपेठेत नेहमीपेक्षा अधिक गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेत भामटय़ांनी हे कृत्य केले आहे. हिरेबागेवाडी येथील अक्कम्मा तोटगी यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

खडेबाजारपासून गणपत गल्ली येथील एका सराफी दुकानात जाईपर्यंत बॅगमधील दागिने असलेली पर्स पळविण्यात आली आहे. ही घटना नेमकी कोठे घडली? मार्केट पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात की खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात? या विषयी स्पष्ट माहिती मिळविण्यासाठी रात्री उशीरापर्यंत या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत होते.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्कम्मा तोटगी यांचे पती निवृत्त सैनिक आहेत. मिलिटरी कॅन्टीनला जाऊन सामान खरेदी करण्यासाठी त्या आपल्या वहिनी समवेत बेळगावला आल्या होत्या. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास दागिने दुरुस्ती करण्यासाठी गणपत गल्ली येथील एका सफारी दुकानाकडे निघाले होते. खडेबाजार मार्गे गणपत गल्लीत जाताना पाठिवर घातलेल्या बॅगमध्ये दागिन्यांची पर्स होती.

गणपत गल्ली येथील विजयआशा ज्वेलर्समध्ये अक्कम्मा पोहोचल्या. त्यावेळी बॅगमधील पर्स चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. मार्केट पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. मात्र ही घटना नेमकी कोठे झाली? याचा स्पष्ट उलगडा झाला नाही म्हणून रात्री मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून मार्केट पोलीस दागिने चोरणाऱया भामटय़ांचा शोध घेत आहेत.

पाकिटमारीत महिलाही

खडेबाजार, गणपत गल्ली परिसरात पाकिटमारी करण्यासाठी काही महिला गुन्हेगारही सक्रिय असतात. स्थानिक व्यापाऱयांनी वारंवार पोलिसांकडे तक्रार करुनही पाकिटमारी करणाऱया गुन्हेगारांचा बंदोबस्त केला जात नाही. मुख्य बाजारपेठेत काही महिला नेहमी नशेत वावरत असतात. यापूर्वीही दागिने किंवा पैशांची बॅग पळविण्याच्या घटना घडल्या आहेत. अक्कम्मा तोटगी यांच्या बॅगमधील दागिने असलेली पर्स महिला गुन्हेगारांनी पळविली की आणखी कोण? याचा तपास करण्यात येत आहे.

Related Stories

देवींच्या मूर्तींचे विसर्जन वेळेत करा

Amit Kulkarni

त्या म्होरक्मयावर कारवाईचे आदेश

sachin_m

यात्रेसाठी परिवहनच्या जादा बसेस धावणार

Amit Kulkarni

स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये कॉन्सन्ट्रेटरयुक्त कोविड केअर सेंटर कार्यरत

Amit Kulkarni

नववर्ष प्रथम दिनी डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये अकरा शिशूंचा जन्म

Patil_p

पतंजली परिवार-पाटीदार समाजातर्फे सामूहिक अग्निहोत्र

Amit Kulkarni
error: Content is protected !!