तरुण भारत

राज्यात आतापर्यंत 70 इंच पावसाची नोंद

प्रतिनिधी/ पणजी

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देऊन हवामान खात्याने आज ‘रेड अर्लट’ जारी केला आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत सरकारी 70 इंच पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 100 इंच पावसाची नोंद पेडणे केंद्रावर झालेली आहे.

Advertisements

गोव्यात आज मुसळधार पावसाची शक्यता गृहित धरून हवामान खात्याने रेड अर्लट जारी केला आहे. काही भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाचा गोव्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे. व गोव्यात अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा दिलेला आहे. तर दि. 20 जुलैपर्यंत ऑरेंज अर्लट जारी करून मुसळधार पाऊस पडेल, असे म्हटले आहे. शनिवारी पावसाचे प्रमाण त्या तुलनेत कमी होते. व भर दुपारी अर्ध्या तासापुरते का असेना गोव्याच्या काही भागात सूर्य दर्शनही झाले.

गेल्या 24 तासांत सर्वाधिक 4 इंच पावसाची नोंद पणजीत नोंदविली गेली. म्हापसा 2 इंच, पेडणे 2 इंच, जुने गोवे 3 इंच, सांखळी वाळपई प्रत्येकी 1 इंच, काणकोण 2.5 इंच, दाबोळी 4 इंच, मडगाव 2.5 इंच मुरगाव 4.5 इंच अशी नोंद झालेली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यात आतापर्यंत 76.5 इंच पावसाची नोंद झाली तर दक्षिण गोव्यात आतापर्यंत 63.13 इंच पावसाची नोंद झालेली आहे. यामुळे सरासरीच्या तुलनेत राज्यात आतापर्यंत 10 इंच अतिरिक्त पाऊस झालेला आहे.

Related Stories

नावेली अपघातात 1 ठार, चालकाला अटक

Omkar B

गोवा षष्ठय़ब्ध्दी सोहळ्य़ास राष्ट्रपतींची खास उपस्थिती

Patil_p

स्कुटरवरून पडल्याने महिला ठार

Patil_p

… तर संपूर्ण गोव्यातील पोलिसस्थानके कमी पडतील

Patil_p

कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढच

Patil_p

आधी पक्षविस्तार, नंतर युतीचा विचार

Patil_p
error: Content is protected !!