तरुण भारत

पाकिस्तानात अफगाणी राजदूताच्या मुलीचे अपहरण

ऑनलाईन टीम / काबुल : 

पाकिस्तानातील अफगाणिस्तानचे राजदूत नजिबुल्लाह अलिखिल यांच्या मुलीचे इस्लामबादेत सशस्त्र हल्लेखोरांनी अपहरण केले. सिलसिला असे अपहरण झालेल्या अलिखिल यांच्या मुलीचे नाव असून, तिला काही तास डांबून ठेवून मारहाण करण्यात आली. मात्र, सिलसिला या तेथून पळ काढण्यात यशस्वी झाल्या. 16 जुलै रोजी सिलसिला यांचे अपहरण झाले होते. या प्रकरणातील दोषींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानकडे केली आहे.

Advertisements

दरम्यान, नजिबुल्लाह अलिखेल यांनीही या प्रकरणी ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, शुक्रवारी इस्लामाबादेत आपल्या घरी परतत असताना माझ्या मुलीचे अपहरण करण्यात आले. तिला डांबून ठेवून मारहाणही करण्यात आली. ईश्वराची कृपा म्हणून माझी मुलगी त्याठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झाली. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.

Related Stories

देशाचे माजी ॲटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनाने निधन

datta jadhav

वीज वितरण कंपन्यांना ‘अच्छे दिन’ शक्य

Patil_p

शिवसेनेकडून नाशिकमधील भाजप कार्यालयाची तोडफोड

Abhijeet Shinde

कर्नाटक केएसईटी २०२१ परीक्षेची तारीख जाहीर

Abhijeet Shinde

सत्ता भागीदारीवरून नॉर्दर्न अलायन्सशी चर्चा

Patil_p

एका कायद्यामुळे चोर मालामाल

Amit Kulkarni
error: Content is protected !!